शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:00 IST

Ahmedabad Plane Crash: गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील प्रवासी आणि कर्मचारी आणि इतर अशा मिळून २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या भयंकर अपघातात विमानातून प्रवास करत असलेल्या विश्वास कुमार नावाच्या एका प्रवाशाचे प्राण मात्र आश्चर्यकारकरीत्या वाचले होते.

गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील प्रवासी आणि कर्मचारी आणि इतर अशा मिळून २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या भयंकर अपघातात विमानातून प्रवास करत असलेल्या विश्वास कुमार नावाच्या एका प्रवाशाचे प्राण मात्र आश्चर्यकारकरीत्या वाचले होते. त्यामुळे हा प्रवासी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच तो कसा वाचला असावा, याबाबत वेगवेगळ तर्क लढवले जात आहेत. तसेच विविध दावेही केले जात आहेत. दरम्यान, ब्रिटिश नागरिक असलेल्या आणि मूळच्या दीव येथील असलेल्या विश्वास कुमार याच्यासाठी या भयानक अपघातात प्राणरक्षक ठरलेल्या जमिनीवरील त्या वस्तूबाबतची माहिती आता समोर आली आहे. 

अहमदाबादमधील या अपघातात विश्वास कुमार हा चमत्कारिकरीत्या बचावला होता. मात्र त्याचा भाऊ या अपघातात मृत्युमुखी पडला होती. विश्वास कुमार याला आता रुग्णालयातून उपचार करून सोडण्यात आले आहे. त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, मी ज्या ११ ए क्रमांकाच्या सीजवर बसलो होतो तिच्या जवळ आपातकालिन दरवाजा होता. तसेच विमानाला अपघात झाल्यावर माझी सीट निखळली आणि बाहेर पडली. त्यानंतर जे काही घडलं तो देवाचा एक चमत्कार होता. अपघातानंतर निखळलेली ही सिट मातीच्या एका ढिगाऱ्यावर पडली. ही भुसभुशीत माती हॉस्टेल आणि मेसच्या इमारतीदरम्यान गोळा करून ठेवण्यात आली होती.

आश्चर्याची बाब म्हणजे ही माती तिथे जाणीवपूर्वक ठेवण्यात आली होती. विश्वास कुमार हे ज्या मातीच्या ढिगाऱ्यावर सिट आणि इतर तुकड्यांसह कोसळले होते. ती माती तिथे एक लँडस्केप तयार करण्यासाठी ठेवण्यात आली होती. अनेक दिवसांपासून या परिसराच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. या पसरलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळेच विश्वास याला अधिक दुखापत झाली नाही.

विश्वास कुमार यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, सुरुवातीला मला वाटलं की माझा मृत्यू झाला आहे. मात्र तेवढ्यात विमानाच्या ट्युब असलेल्या भागात फट असल्याचे मला दिसले. मी सिटबेल्ट उघडली आणि पायांनी धक्का देत पुढे जात राहिलो. त्यानंतर उठून आगीपासून दूर गेलो. पुढे काय झालं हे लोकांच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालं आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया