शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

जीवरक्षकांच्या अंगणातच झाली जीवांची राख!

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: June 13, 2025 09:30 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : डॉक्टरांच्या वस्तीगृहातील खानावळीत जेवणासाठी ताटं वाढली जात असतानाच अचानक वरून वस्तीगृहाच्या इमारतीत एअर इंडियाचे विमान येवून धडकले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या वेळी अचानक आगडोंब उडाला आणि परिसरातील शेकडो जीवांची अक्षरश: राख झाली.

- रमाकांत पाटीलनंदुरबार - डॉक्टरांच्या वस्तीगृहातील खानावळीत जेवणासाठी ताटं वाढली जात असतानाच अचानक वरून वस्तीगृहाच्या इमारतीत एअर इंडियाचे विमान येवून धडकले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या वेळी अचानक आगडोंब उडाला आणि परिसरातील शेकडो जीवांची अक्षरश: राख झाली.

विमान अपघाताबाबत अहमदाबादमधील काही लोकांशी मोबाईलवरुन संपर्क साधल्यावर त्यांनी ही माहिती दिली. अपघातग्रस्त परिसरात जळून कोळसा झालेल्या मृतदेहांचा अक्षरश: खच पडला असून, अपघात झाल्यानंतर बचावासाठी धावून आलेल्यांपैकी काही जण हे दृश्य पाहून अक्षरश: भोवळ येवून खालीच कोसळले. या घटनेत विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, अक्षरश: कोळसा झालेले मृतदेह सीव्हील हॉस्पीटलमध्ये आणले गेले. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटणे शक्य नसल्याने त्यांचे डीएनए सॅम्पल घेवून ओळख पटविण्याचे प्रयत्न आहे.

यासंदर्भात गुजरातचे आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी विमानातील प्रवाशांच्या जवळच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पल देण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी रूग्णालयातील कसोटी भवनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रूग्णालयात स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी-मुलीची भेट अधुरीच...या दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयभाई रूपाणी हेदेखील प्रवास करीत होते. त्यांची पत्नी अंजलीबेन रूपाणी ह्या सध्या लंडनमध्ये कन्या राधीकाबेन यांच्याकडे गेल्या आहेत. ते लंडनला मुलीची भेट घेवून पत्नी अंजलीबेन यांना घेवून येणार होते. यासंदर्भात त्यांनी बुधवारी सायंकाळीच गुजरातचे माजीमंत्री भुपेंद्रसिंह चुडासामा यांच्याशी झालेल्या संवादात सांगितले होते. मात्र त्यांची पत्नी व कन्याची भेट अपूर्णच राहिली. 

राज्यातील स्वयंसेवकांचा संपर्कासाठी प्रयत्नअहमदाबाद व परिसरात महाराष्ट्रातील अनेक जण वास्तव्यास आहेत. संपूर्ण परिसरात छिन्न विच्छिन्न पडलेले मृतदेह तसेच खाक झालेले मानवी सांगाडे असल्याने त्याभागाचा ताबा प्रशासनाने घेतला होता. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती अतुलभाई पटेल व मोहनभाई पटेल यांनी दिली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर