शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:22 IST

अपघातानंतर अहमदाबाद प्रशासनाने घटनास्थळाचे सखोल सर्वेक्षण केले. या दरम्यान, मृतांच्या शरीराचे अनेक भाग नंतरही सापडले.

गेल्या महिन्यात १२ जून रोजी झालेल्या एका भयानक विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या भीषण दुर्घटनेत २७०हून अधिक प्रवाशांचा करुण अंत झाला. अपघातानंतर अनेकांना आपल्या आप्तांच्या मृतदेहांची प्रतीक्षा होती आणि डीएनए चाचणीनंतर अनेक तासांनी कुटुंबाकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आले. पण, काही मृतदेहांचे अवशेष घटनास्थळीच राहिले होते. या उरलेल्या अवशेषांवर गुजरात सरकारने आता अंतिम संस्कार केले आहेत.

अवशेष सापडले, डीएनएने ओळख पटवलीअपघातानंतर अहमदाबाद प्रशासनाने घटनास्थळाचे सखोल सर्वेक्षण केले. या दरम्यान, मृतांच्या शरीराचे अनेक भाग नंतरही सापडले. या अवशेषांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली. ओळख पटल्यानंतर गुजरात सरकारने मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी अत्यंत जड अंतःकरणाने या अवशेषांवर अंतिम संस्कार करण्याची परवानगी सरकारला दिली. 

त्यानंतर, रुग्णालय अधीक्षक, न्यायवैद्यक औषध विभागाचे प्रमुख (HOD), वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या अवशेषांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

२६ पैकी १९ अवशेषांवर सरकारने केले अंत्यसंस्कारया प्रकरणाची माहिती देताना गुजरात आरोग्य विभागाने सांगितले की, डीएनए नमुने घेतल्यानंतरच कुटुंबीयांना कळवण्यात आले होते की, भविष्यात त्यांच्या प्रियजनांच्या मृतदेहांचे काही आणखी भाग सापडू शकतात. यानंतर, तपासणीत २६ मृतदेहांचे अवशेष पुन्हा मिळाले. याची माहिती तात्काळ कुटुंबीयांना देण्यात आली.

प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर, या २६ पैकी ७ मृतांचे कुटुंबीय आले आणि त्यांनी आपल्या प्रियजनांचे अवशेष ताब्यात घेतले. उरलेल्या १९ मृतांच्या कुटुंबीयांनी अवशेषांवर सरकारनेच अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली, त्यानंतर प्रशासनाने अत्यंत सन्मानाने त्यांचे अंत्यविधी पार पाडले.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या १९ अवशेषांपैकी १८ अवशेषांवर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले, तर एका अवशेषाला दफनविधी करण्यात आले. प्रशासनाने स्पष्ट केले की, एक अवशेष इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीचा होता, त्यामुळे इस्लामिक रितीरिवाजानुसार त्याच्यावर दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात