शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

प्लास्टिक बॉटल जमा करा अन् पैसे मिळवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 13:39 IST

या बॉटल्सपासून धागा अथवा तार बनविण्यात येणार आहे. तसेच याचा वापर टीशर्ट, हवा भरलेली उशी, टीव्ही, फ्रीजचे कव्हर बनविण्यासाठीही होणार आहे. 

अहमदाबाद - प्लास्टिक बॉटल जमा केल्यानंतर त्याबदल्यात अहमदाबादमधील नागरिकांना लवकरच पैसे मिळणार आहे. सॉलिड वेस्ट मॅनजमेंट या प्रकल्पासाठी अहमदाबाद महानगरपालिका शहरातील 5 जागांवर रिवर्स वेडिंग मशीन लावणार आहे. जेथे शहरातील नागरिक प्लास्टिक बॉटल जमा करु शकतील. 

सूत्रांच्या माहितीनुसार बॉटलच्या आकाराप्रमाणे नागरिकांना प्रति बॉटल एक रुपया देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे संचालक हर्षद सोलंकी यांनी सांगितले की, अहमदाबादमध्ये दिवसाला 3, 200 मेट्रीक टन कचरा जमा होता. यामध्ये 110 मेट्रीक टन कचरा प्लास्टिक बॉटलचा असतो. या वेडिंग मशीन चालविण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सगळ्या बॉटल एकत्र करुन त्याचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. या बॉटल्सपासून धागा अथवा तार बनविण्यात येणार आहे. तसेच याचा वापर टीशर्ट, हवा भरलेली उशी, टीव्ही, फ्रीजचे कव्हर बनविण्यासाठीही होणार आहे. 

महानगरपालिका आणि गुजरात पर्यावरण नियंत्रण बोर्ड यांच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर गुजरातच्या प्रत्येक शहरात या वेडिंग मशीन बसविण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सध्या या मशीन अहमदाबादमधील चित्रा पब्लिक पार्क, प्रेमचंदनगर, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, ओएनजीसी मोटेरा कॉम्प्लेक्स, गांधीनगर, भटगाम याठिकाणी लावण्यात येतील. या मशीनची जबाबदारी तीन वर्षासाठी कंत्राटदारांवर सोपविण्यात येणार आहे. कंत्राटदारांना भाड्याने जमीन देऊन मशीन लावण्यासाठी 101 रुपये भाडे आकारण्यात येईल. कंत्राटदारांना लोकांकडून बॉटल घेतली त्याबदल्यात त्यांना पैसे देतील. यानंतर जमा झालेल्या बॉटल्स पुर्नवापर करणाऱ्यांकडे जाऊन विकतील.  

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीGujaratगुजरात