शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
7
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
8
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
9
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
10
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
12
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
13
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
14
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
15
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
16
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
17
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
18
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
19
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
20
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप

पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:21 IST

Ahmedabad Air india Plane Crash report: अहमदाबादेतील एआय १७१ विमान अपघात; एएआयबीच्या प्राथमिक चाैकशी अहवालातील संकेत, मात्र अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमान १७१ मध्ये दोन्ही इंजिनांचे इंधन नियंत्रण स्विच बंद झाले होते, असे प्राथमिक तपास अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे बोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या पायलटकडून मोठी चूक झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. मात्र, अहवालावर एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने नाराजी व्यक्त करीत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. ही चौकशी गोपनीय व पायलटवर पक्षपात करणारी आहे. यातील निष्कर्ष गडबडीत घेतले गेले असल्याचेही त्यांनी म्हटले. तर हा अहवाल कंपन्यांना वाचवत असून पायलटला दोषी ठरवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

१५ पानांच्या तपास अहवालानुसार, दोन्ही इंजिनांचे इंधन नियंत्रण कंट्रोल स्विच अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने 'रन' स्थितीतून 'कटऑफ' स्थितीत गेले, यामुळे उड्डाणाच्या काही सेकंदांतच विमानाची उंची झपाट्याने कमी झाली.

स्विच 'कटऑफ' कसे झाले, याचा स्पष्ट उल्लेख नाहीइंधन नियंत्रण स्विच 'कटऑफ' स्थितीत नेमके कसे गेले तसेच दोष कोणाचा हेही अहवालात ठोसपणे सांगितले गेलेले नाही. विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, त्यामुळे अपघातास मानवी चूकच कारणीभूत ठरल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे विमान अपघाताची सर्व चूक पायलटवर टाकल्याचे अहवालात स्पष्ट होते.

‘ते’ ३२ सेकंद१:३८:३९ PMउड्डाण भरले१:३८:४२ PMवेग ३३३ किमी प्रतितास; १ सेकंदाच्या अंतराने दोन्ही इंजिन बंद१:३८:५२ PMपायलटने इंजिन-१ सुरू करण्याचा स्विच ऑन केला, थोड्या वेळासाठी इंजिन चालू झाले१:३८:५६ PMपायलटने इंजिन-२ सुरू करण्याचा स्विच ऑन केला, परंतु इंजिन सुरू झाले नाही१:३९:०५ PMपायलटने ‘मे डे कॉल’ दिला, पण प्रतिसाद येण्यापूर्वीच विमान कोसळले१:३९:११ PMफ्लाइट रेकॉर्डरने रेकॉर्डिंग बंद केले

असा झाला दोन्ही इंजिनांमध्ये बिघाडएएआयबीच्या अहवालात म्हटले आहे की, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनांचे फ्युएल कंट्रोल स्विच रनवरून कट ऑफ या स्थितीत गेले. मात्र, हे कोणी केले किंवा कसे झाले याचा अहवालात उल्लेख नाही.इंजिनाचे आरपीएम (एन१ व एन२) कमी होऊ लागले तसतसे इंधनपुरवठा थांबवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रॅम एअर टर्बाईन (आरएटी) कार्यान्वित झाला. तो आपत्कालीन ऊर्जेचा पुरवठा करतो. त्यानंतर १० सेकंदांनी इंजिन क्रमांक १चा इंधन नियंत्रण स्वीच पुन्हा रन स्थितीत आणण्यात आला.त्यानंतर चार सेकंदांनी इंजिन क्रमांक २ची हीच स्थिती झाली. दोन्ही इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न पायलटनी केला. मात्र, इंजिन क्र. १ पुन्हा कार्यान्वित झाले. इंजिन क्रमांक २ मात्र नीट सुरू झाले नाही. त्यामुळे एका पायलटने मेडे मेडे मेडे असा आपत्कालीन कॉल दिला. मात्र, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून काही उत्तर मिळण्यापूर्वीच हे विमान काही झाडांना धडकून वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. हे विमान को-पायलट उडवत होता व कॅप्टन साऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत होता. विमानाने उड्डाण केले व त्यानंतर केवळ ३० सेकंदांत ते कोसळले.

विमान वाहतूक तज्ज्ञांना काय वाटते?विमानात यांत्रिक समस्या किंवा वीज पुरवठा बंद झाल्यानंतर विमानाला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचची स्थिती बदलली असावी. जेव्हा इंधन नियंत्रण स्विच बंद करावा लागतो तेव्हा एक पायलट दुसऱ्या पायलटला सांगतो. त्यानंतरच हा स्विच बंद केला जातो. अपघातावेळी काही सॉफ्टवेअर बिघाड झाला का हे तपासणेही महत्त्वाचे असल्याचे विमान वाहतूक तज्ञांनी सांगितले.

केवळ प्राथमिक अहवाल आहे. लगेच कोणताही निष्कर्ष काढणे 'अपरिपक्व' ठरेल. ही अत्यंत तांत्रिक बाब आहे. त्यामुळे यंत्रणा याचा तपास करत आहे. अंतिम अहवाल लवकरच येईल. के. राम मोहन नायडू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री

एएआयबीने सादर केलेला अहवाल हा प्राथमिक स्वरूपाचा असून, त्यावरून कुठलाही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. पायलटमधील संवाद खूपच मर्यादित स्वरूपाचा आहे. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया