शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:11 IST

Air India Plane Crash, Vijay Rupani news : विजय रुपाणी आपल्या विमानातून प्रवास करत असल्याचा सेल्फी त्यांच्या पुढील सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. लंडनला जाणाऱ्या या एअर इंडियाच्या विमानात २४२ प्रवासी होते, तर हे विमान ज्या भागात कोसळले तो रहिवासी भाग होता. बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पहिले विमान धडकले आहे. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते, हे आता स्पष्ट होत आहे. 

मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त

विजय रुपाणी आपल्या विमानातून प्रवास करत असल्याचा सेल्फी त्यांच्या पुढील सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. बिझनेस क्लासमधून रुपाणी लंडनला जात होते. रुपाणी यांची पत्नी आणि मुलगी लंडनला राहत आहेत. त्यांना भेटण्यासाठी रुपाणी निघाले होते. विजय रुपाणी यांचे नाव प्रवाशांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहे आणि त्यांचा सीट क्रमांक २डी आहे. दरम्यान, अद्याप मृतांचा आकडा समोर आलेला नाही. परंतू, २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच बीजे मेडिकल कॉलेजच्या २० हून अधिक इंटर्नचा देखील मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

विमान अपघाताची व्याप्ती समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादला रवाना झाले होते. यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादला रवाना झाले आहेत. अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 

बचाव कार्यासाठी पोलीस, एनडीआरएफ, पोलीस, सैन्याचे जवान, बीएसएफ आदी यंत्रणा काम करत आहे. प्रवाशांच्या नातेवाईकांच्या संपर्कासाठी तातडीने हेल्प डेस्क निर्माण करण्यात येत आहे. 

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीPlane Crashविमान दुर्घटनाNarendra Modiनरेंद्र मोदीAir Indiaएअर इंडिया