शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 07:57 IST

Ahmedabad Air India Plane Crash : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा सर्वात भाग्यवान क्रमांक गुरुवारी त्यांच्यासाठी अशुभ ठरला.

Vijay Rupani: अहमदाबाद विमान कोसळून झालेल्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्येएअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. या दुर्दैवी अपघातात विमान प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमान अपघातात मृत्यूमुखी पडले आहे. विजय रुपाणी हे त्यांची पत्नी अंजली आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. या घटनेनंतर विजय रुपाणी यांच्या बाबतीत १२-०६ या आकड्यांचा एक योगायोग समोर आला आहे. विजय रुपाणी यांचा निधनाची तारीख ही १२ जून होती.

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लंडनला जाणारे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. कोसळताच विमानाचे आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले आणि ते काही क्षणातच राख झाले. या घटनेनंतर संपूर्ण शहर धुराने झाकले गेले. अहमदाबाद-लंडन एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह सर्व २४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे १२०६ हा अंक त्यांच्यासाठी भाग्यवान मानत असत. त्यांनी अनेकदा याबाबत बोलूनही दाखवले होते. '१२०६' हा नंबर त्यांच्यासाठी इतका खास होता की त्यांच्या अनेक वाहनांचा नंबर प्लेटवरही हेच आकडे होते. पण गुरुवारी हा अंक त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला. विजय रुपानी यांची पहिली कार आणि त्यांची अनेक वर्षे जुनी स्कूटर दोन्हीचा क्रमांक १२०६ होता. त्यांना हा क्रमांक त्यांच्यासाठी खूप भाग्यवान वाटायचा. आजही ही कार आणि स्कूटर त्यांच्या घराबाहेर पार्क केलेली आहे. पण योगायोगाने, गुरुवारची तारीख देखील १२-०६ होती जी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरली.

विमान अपघाताची बातमी मिळताच विजय रुपानी यांच्या घराभोवती शांतता पसरली होती. त्यांच्या शेजाऱ्यांनी घराजवळील मंदिरात प्रार्थना करण्यास सुरुवात केली. रुपानी यांच्या घरात कोणीही उपस्थित नव्हते. अपघातानंतरच विजय रुपाणी हे विमानात असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र काही वेळातच विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच सर्व दिवंगत आत्म्यांना शांती मिळावी अशी देवाकडे प्रार्थना केली. या कठीण काळात शोकग्रस्त कुटुंबाला धीर आणि धैर्य मिळावे असेही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कमी उंचीवर आले आणि बी.जे. मेडिकल कॉलेजच्या मेस इमारतीला धडकले. त्यानंतर, विमान जवळच्या अतुल्यम वसतिगृहालाही धडकले. तिथे निवासी डॉक्टर राहत होते. धडक बसल्यानंतर लगेचच या इमारतींना आग लागली आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादVijay Rupaniविजय रूपाणीAir Indiaएअर इंडिया