शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:32 IST

Ahmedabad Air India Plane Crash news in Marathi: २४ तास झाले त्या महिलेचा मुलगा आपल्या आईला आणि चिमुकलीला शोधत आहे. परंतू, कुठेच त्यांचा पत्ता लागत नाहीय. 

एअर इंडियाचा अपघात किती भीषण होता याची कल्पना आता साऱ्या जगाला आली आहे. बोईंग कंपनीच्या या वादग्रस्त ड्रीमलायनर विमानाने अनेकांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत. या अपघात स्थळावरून एक धक्कादायक बातमी येत आहे. ज्या डॉक्टरांच्या इमारतीवर हे विमान आदळले त्या इमारतीतील मेस चालविणारी महिला आणि तिची अडीज वर्षांची नात बेपत्ता आहेत. २४ तास झाले त्या महिलेचा मुलगा आपल्या आईला आणि चिमुकलीला शोधत आहे. परंतू, कुठेच त्यांचा पत्ता लागत नाहीय. 

मेडिकल कॉलेजची मेस सरला ठाकोर आणि त्यांचे पती चालवत होते. विमान अपघाताच्या दिवशी सरला या त्यांची नात आद्याला देखील घेऊन आल्या होत्या. रवी ठाकोर यांचे वडील डबे देण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते, परंतू सरला आणि आद्या हॉस्टेलच्या मेसमध्येच होत्या. त्या दोघींचाही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने सरला यांचा मुलगा आपल्या आईला आणि पोटच्या लेकीला वेड्यासारखा शोधत आहे. त्याने मृतदेह ठेवलेली हॉस्पिटल पालथी घातली आहेत, ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरु आहेत तिथेही तो पाहून आला आहे. परंतू, कुठेच त्याला त्याची आई आणि मुलगी दिसली नाहीय. 

यामुळे रवी वेड्यासारखा गेल्या २४ तासांपासून हॉस्टेल आणि मेसच्या परिसरात फिरत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला मेसमध्ये जाऊ दिले जात नाहीय. माझी आई तिथे स्वयंपाक करत होती आणि माझी मुलगी तिच्यासोबत होती. मी रात्रभर सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये त्यांचा शोध घेतला. प्रशासनाने जारी केलेल्या याद्या मी पाहिल्या आहेत, परंतु आतापर्यंत आई आणि मुलीचा कोणताही पत्ता लागलेला नाही, असे रवी याने प्रसारमाध्यमांना सांगितले. 

सर्व विद्यार्थ्यांचे मृतदेह ओळखले गेले आहेत, परंतु माझ्या आई आणि मुलीची नावे अजूनही बेपत्ता लोकांच्या यादीत आहेत. मला वाटतेय की ते अपघात झाला तेव्हा पायऱ्या उतरून तळमजल्यावर गेले असावेत. मला फक्त एकदा हॉस्टेलमध्ये त्यांचा शोध घेण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन त्याने अधिकाऱ्यांना केले आहे. 

मेसमध्ये चपाती बनवणाऱ्या मीना मिस्त्री या वाचल्या आहेत. त्यांनी म्हटले की जसे आम्ही विमान पडताना पाहिले तसे आम्ही चाव्या, मोबाईल तिथेच ठेवून पळालो. जीव वाचवण्यासाठी धावलो, असे त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद