शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश

By नंदकिशोर पाटील | Updated: June 13, 2025 13:37 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash: गुरुवारी भारतातील अहमदाबाद शहरात झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामुळे ड्रीमलाइनर ७८७-८ या विमानाच्या निर्मिती कंपनी बोइंगवर पुन्हा एकदा अमेरिकन मीडियाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.   अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अमेरिकन मीडियात या विमानातील काही त्रुटींवर चर्चा सुरू झाली आहे. 

- नंदकिशोर पाटील वॉशिंग्टन -  गुरुवारी भारतातील अहमदाबाद शहरात झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामुळे ड्रीमलाइनर ७८७-८ या विमानाच्या निर्मिती कंपनी बोइंगवर पुन्हा एकदा अमेरिकन मीडियाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.   अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अमेरिकन मीडियात या विमानातील काही त्रुटींवर चर्चा सुरू झाली आहे. 

बोइंगच्या मते, ७८७-८ हे विमान हे “सर्वोत्तम विक्री होणारे प्रवासी वाइडबॉडी विमान” आहे. २०११ मध्ये प्रथमच विमानसेवा कंपन्यांना वितरित झाल्यापासून हे विमान एक अब्जांहून अधिक प्रवाशांनी प्रवासासाठी वापरले आहे. आम्ही एअर इंडियाच्या फ्लाइट १७१ संदर्भात भारताच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. अपघातग्रस्त प्रवाश्यांचे कुटुंबीय, बचाव पथक व अन्य प्रभावित लोकांसोबत आमच्या सहवेदना आहेत, असे बोइंगने दिलेल्या निवेदनात म्हटले.

सीट अचानक पुढे सरकली अन्...ड्रीमलाइनर ७८७-८ चा हा पहिला अपघात आहे. यापूर्वी काही चौकशी या विमानाबाबत झाली होती, असे वृत्त सीबीएस न्यूजनेदिले आहे. सीएनएन वृत्त वाहिनीने म्हटले आहे की, गेल्या वर्षी, फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने ड्रीमलाइनरच्या कॉकपिट सीट्सची तपासणी करण्याचे आदेश दिले होते, कारण एका घटनेत पायलटची सीट अचानक पुढे सरकली व त्यामुळे ऑटोपायलट प्रणाली डिसकनेक्ट झाली होती, असे समोर आले आहे. 

७७७ विमानांच्या असेंब्ली प्रक्रियेतही त्रुटी  गेल्या वर्षी बोइंगच्या एका गुणवत्ता अभियंत्याने ( व्हिसलब्लोअर), आरोप केला होता की, ड्रीमलाइनर तयार करताना कंपनीने काही शॉर्टकट घेतले, ज्यामुळे ड्रिलिंगच्या ठिकाणी मलबा उरला आणि कंपोझिट मटेरियलमध्ये विकृती निर्माण झाली. ७७७ विमानांच्या असेंब्ली प्रक्रियेतही त्रुटी असल्याचे संबंधित अभियंत्याने सांगितले होते, असे त्याच्या वकिलांनी फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशनला दिलेल्या पत्रात म्हटले होते, असा दावा सीबीएस न्यूजने केला आहे.

बोइंगवरील इतर सुरक्षा प्रश्न काय आहेत?या अपघाताआधीही बोइंग कंपनीच्या इतर सुरक्षासंबंधी बाबी चर्चेत होत्या. विशेषतः ७३७ मॅक्स जेटलाइनरच्या २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या दोन अपघातांमुळे कंपनीवर चौकशी व खटले दाखल झाले आहेत.त्या दोन अपघातांमध्ये एकूण ३४६ लोकांचा मृत्यू झाला होता.मे महिन्यात, बोइंगने अमेरिकेच्या न्याय विभागासोबत १.१ अब्ज डॉलरचा करार केला. या करारामुळे २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या अपघातांप्रकरणी कंपनीवर खटला चालवला जाणार आहे. 

२०१४ मध्ये हे अपघातग्रस्त विमान एअर इंडियाकडे सुपूर्द करण्यात आले होते, असे सिरिअम या कंपनीने माहिती देताना सांगितले.४१,००० तासांहून अधिक प्रवास या विमानाने आतापर्यंत पूर्ण केला आहे.  तसेच सुमारे ८,००० उड्डाणे आणि लँडिंग केली होती.८.४ वर्षे जुन्या असलेल्या १९० विमानांचा वापर एअर इंडिया करत आहे. सध्या जगभरात १,१०० हून अधिक ड्रीमलाइनर विमाने कार्यरत आहेत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद