शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:14 IST

DGCA on Air India Plane Crash: २०१३ मध्ये जपानमध्ये या विमानाचा अपघात झाल्यानंतर डीजीसीएने तीन महिने या विमानांचे उड्डाण थांबविले होते. यानंतर आता १२ वर्षांनी पुन्हा एकदा डीजीसीएने बोईंगच्या या वादग्रस्त विमानांच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

DGCA Orders Safety Inspection: अहमदाबादविमान अपघातात शेकडो प्रवाशी, इंटर्न डॉक्टरांचे मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की प्रवाशांसह विमानतळ परिसरातील प्राणी, पक्ष्यांचाही यात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर बोईंग कंपनीची ड्रीमलायनर ही विमाने पुन्हा एकदा वादात सापडली आहेत. यामुळे डीजीसीएने पुन्हा एकदा या विमानांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. 

२०१३ मध्ये जपानमध्ये या विमानाचा अपघात झाल्यानंतर डीजीसीएने तीन महिने या विमानांचे उड्डाण थांबविले होते. यानंतर आता १२ वर्षांनी पुन्हा एकदा डीजीसीएने बोईंगच्या या वादग्रस्त विमानांच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक ड्रीमलायनर विमानाची विशेष तपासणी करणे बंधनकारक असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. 

उड्डाणापूर्वी डीजीसीएने अनेक महत्त्वाच्या तांत्रिक तपासण्यांचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग, केबिन एअर कॉम्प्रेसर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण चाचणी, इंजिन इंधन अ‍ॅक्च्युएटर ऑपरेशन, ऑइल सिस्टम आणि हायड्रॉलिक सिस्टमची तपासणी करावी लागणार आहे. टेकऑफपूर्वी पॅरामीटर्सचे योग्यरित्या पाहणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. 

ही प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत सुरू ठेवण्यात यावी असेही डीजीसीएने म्हटले आहे. दोन आठवड्यांच्या आत पॉवर अ‍ॅश्युरन्स तपासणी देखील बंधनकारक केली आहे. तसेच गेल्या १५ दिवसांत बोईंग ड्रीमलाइनर विमानात आढळलेल्या समस्या आणि वारंवार येत असलेल्या बिघाडांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. हे बिघाड तातडीने दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादairplaneविमान