शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आधार पुन्हा बनणार सरकारसाठी डोकेदुखी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:55 IST

आधार पुन्हा एकदा सरकारला प्रशासन आणि राजकीय पातळीवर नवी डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : आधार पुन्हा एकदा सरकारला प्रशासन आणि राजकीय पातळीवर नवी डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत. हा संघर्ष आधार प्राधिकरण आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांच्यात होणार असे दिसते. सीएससीची प्रशंसा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली होती. आधार खेड्यापाड्यांत सरकारी सेवा, योजना पोहोचवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सीएससी आणि आधार प्राधिकरण दोन्ही माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत मोडतात. संघर्षाचे मुख्य कारण स्वदेशी विरुद्ध बहुराष्ट्रीय कंपनी, असे वळण घेत आहे.सीएससी चालवणारे उत्तर प्रदेशचे महेश म्हणाले की, डाटा लीकचा मुद्दा हे निमित्त आहे. आधार प्राधिकरणच्या प्रमाणनानंतरच आधारचे यंत्र विकत घेतले जाते. देशात २२ हजार सीएससीवर जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त आधार यंत्रे आहेत. त्यांची संख्या वाढत आहे. सीएससी संचालक आपली आयुष्याची कमाई गुंतवून ही यंत्रे विकत घेतात. आम्ही ही यंत्रे खरेदी केली ती ते एक रोजगाराचे साधन आहे म्हणून. जेव्हा कोणी अद्ययावत नोंदी करण्यासाठी येतो तेव्हा दहा ते २० रुपये देतो. त्याचा सगळा डाटा आधार प्राधिकरणकडून तपासला जातो तर मग डाटा कुठे लीक होतो? मोठ्या कंपन्यांना काम देण्याचा हा सरळसरळ प्रयत्न आहे. यासाठी आधार केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या उलाढालीची अट घालण्यात आली आहे. याविरोधात आम्ही आधार प्राधिकरणला घेराव घालण्याच्या तयारीत आहोत.काय आहे नेमका वाद?सीएससी संचालकांचे म्हणणे असे आहे की, मोठ्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी उलाढाल आणि इतर अनेक नियम जोडून सीएससीकडून आधारचे काम हिसकावून घेतले जात आहे.तिकडे आधारने याला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याचा आधार देऊन सांगितले की, डाटा लीकचा प्रश्न सोडवण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्राच्या धर्तीवर आधार प्राधिकरणची थेट देखरेख असलेले आधार सेवा केंद्र सुरू केले जातील. त्यामुळे डाटा लीकची शंका संपून जाईल, तरीही सीएससी संचालक आधार प्राधिकरणसमोर धरणे देण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकार