शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Agusta Westland Scam: मनमोहन यांच्यावर होता काँग्रेसचा दबाव, मिशेलच्या चिठ्ठीतून गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 15:17 IST

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात दलाली दिल्याचा आरोप असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलच्या अटकेनंतर काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे. 

नवी दिल्ली- अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात दलाली दिल्याचा आरोप असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलच्या अटकेनंतर काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे. या प्रकरणात आता मिशेलकडे एक चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठीत फिनमेकॅनिका कंपनीचे सीईओ जुसेपी ओरसी यांना लिहिण्यात आली आहे. ज्यात लिहिलं आहे की, सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाचा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दबाव होता. तसेच मिशेलला या कराराची सर्व माहिती संबंधित मंत्रालयाकडून मिळत असल्याचंही या चिठ्ठीतून समोर आलं आहे. 

28 ऑगस्ट 2009 रोजी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार, मिशेलला अगुस्ता वेस्टलँडसंबंधित सर्व माहिती पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालयासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत होती. इतकेच नव्हे, तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या भेटीसंदर्भातही त्याला माहिती होती. 

जुसेपी ओरसी यांना लिहिलेल्या चिठ्ठीत मिशेलनं दावा केला आहे की, या करारासंदर्भात कॅबिनेटची जी बैठक होणार आहे. त्यासंदर्भात मला माहीत आहे. या प्रकरणात पंतप्रधान, जॉइंट सेक्रेटरी आणि डिफेन्स सेक्रेटरीदरम्यान जी चर्चा सुरू होती, तीसुद्धा मिशेलला माहिती होती. तसेच तत्कालीन संरक्षण मंत्री या कराराच्या बाजूनं असल्याचंही त्यानं चिठ्ठीत लिहिलं आहे. अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात अटकेत असलेला ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन मिशेल याचे 4 डिसेंबर रोजी भारताला प्रत्यार्पण करण्यात आले होतो. 3600 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात तो भारतातील तपास संस्थांना हवा होता. मागील महिन्यात न्यायालयाने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली होती. प्रत्यार्पणाची ही प्रक्रिया इंटरपोल आणि सीआयडीच्या समन्वयाने झाली.परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) आपले समकक्ष अब्दुल्ला बिन जायद यांच्याशी अबुधाबीमध्ये चर्चा केली होती. सीबीआय आणि ईडीकडून केरण्यात आलेल्या चौकशीच्या आधारे भारताने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी औपचारिक स्वरुपात 2017मध्ये विनंती केली होती. ईडीने मिशेलविरुद्ध जून 2016मध्ये दाखल आपल्या आरोपपत्रात म्हटले होते की, मिशेलला अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात 225 कोटी रुपये मिळाले होते. या आरोपपत्रानुसार, ही रक्कम म्हणजे कंपनीकडून दिलेली लाच होती.

टॅग्स :Agusta Westland Scamऑगस्टा वेस्टलँड घोटाळा