शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विधेयके ही २१ व्या शतकाची गरज; नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संसदेने कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी संमत केलेली विधेयके ही २१ व्या शतकाची गरज आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेने कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी संमत केलेली विधेयके ही २१ व्या शतकाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. मोदी यांनी शेतकऱ्यांना पुन्हा खात्री दिली की, कृषी माल हा किमान आधारभूत भावाने सरकार खरेदी करणे सुरूच ठेवेल.मोदी बिहारमधील नऊ महामार्गांच्या व्हर्च्युअल पायाभरणी समारंभात बोलत होते. या विधेयकांवर विरोधी पक्षांनी ती ‘शेतकरीविरोधी’ असल्याची जोरदार टीका कायम ठेवली व पंजाब व हरयाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विधेयकांसारख्या उपायांचे जोरदार समर्थन केले.ते म्हणाले, यामुळे आता शेतकरी त्यांचा कृषी माल/उत्पादन त्यांना हव्या त्या ठिकाणी व हव्या त्या किमतीत विकायला स्वतंत्र आहेत.विरोधी पक्षांवर टीकेचा हल्ला करताना मोदी म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण काही लोकांच्या कंपूने प्रदीर्घ काळ केले व हाच कंपू शेतमालाच्या विक्रीला शिस्त लावण्याच्या नियमांत अडथळा ठरला. ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते व ती सरकारने बदलली आहे.शेतकºयांची दिशाभूल केली गेलीकृषिक्षेत्रातील या ऐतिहासिक बदलांनंतर काही लोक त्यावरील नियंत्रण गमवताहेत. म्हणून हे लोक आता शेतकºयांची किमान आधारभूत किमतीवरून दिशाभूल करीत आहेत. हेच लोक किमान आधारभूत किमतीवरील स्वामीनाथन समितीच्या शिफारशींना अनेक वर्षे अडथळे बनले होते, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.या विधेयकांचे वर्णन मोदी यांनी ‘खूपच ऐतिहासिक’ अशा शब्दांत केले. ते म्हणाले, जर कोणी म्हणत असेल की सरकारचे नियंत्रण असलेली कृषी माल बाजारपेठ ही या सुधारणांनंतर संपून जाईल ते धादांत खोटे आहे. गेल्या जून महिन्यात कृषी अध्यादेश सरकारने का आणले, हे सांगताना मोदी म्हणाले, अनेक राज्यांत शेतकºयांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीlok sabhaलोकसभा