शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! "मला माझा मुलगा हवाय..."; शहीद लेकाच्या गणवेशाला बिलगून आईचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:50 IST

कॅप्टन शुभम गुप्ता यांचं सर्व सामान राजौरी युनिटमधून घरी पोहोचलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या मुलाची आठवण काढून आईला अश्रू अनावर झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले आग्रा येथील कॅप्टन शुभम गुप्ता यांचं सर्व सामान राजौरी युनिटमधून घरी पोहोचलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या मुलाची आठवण काढून आईला अश्रू अनावर झाले. आईने आपल्या शहीद मुलाचा गणवेश छातीशी कवटाळला आणि मग जोरजोरात रडू लागली. आईला रडताना पाहून घरात उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. कॅप्टन शुभम गुप्ता यांची आई फक्त "मला माझा मुलगा हवाय... त्याला का नाही आणलं?" असं म्हणत होती.  22 नोव्हेंबरला राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शुभम गुप्ता शहीद झाले होते. 12 दिवसांनंतर युनिटमधील लष्करी अधिकारी शुभम यांच्या शेवटच्या आठवणी घेऊन घरी पोहोचले. कॅप्टन शुभम गुप्ता यांनी वापरलेल्या वस्तू ट्रंकमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. ज्यामध्ये गणवेश, कपडे, टोपी आणि इतर वस्तू होत्या. या गोष्टी पाहताच आईला रडू लागली

आपल्या शहीद मुलाच्या गणवेशाला बिलगली. माझा मुलगा कुठे आहे? असंच म्हणत होती. यावेळी लोकांनी तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण आईला अश्रू आवरले नाहीत. तर कॅप्टन शुभम गुप्ता यांचे वडील बसंत गुप्ता देखील स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे देखील डोळे पाणावले.

27 वर्षीय कॅप्टन शुभम गुप्ता यांची 2015 मध्ये आर्मीमध्ये निवड झाली होती. 22 नोव्हेंबर रोजी राजौरीतील धर्मसाल येथील बाजीमल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले होते. या चकमकीत आणखी चार जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांनाही ठार केलं.