शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 16:11 IST

एका सासूने आपल्या सुनेची नेलपॉलिश लावली. सुनेने याला विरोध केला असता कुटुंबीयांमध्ये मोठा वाद झाला.

आग्रामध्ये एक अजब घटना समोर आली आहे. एका सासूने आपल्या सुनेची नेलपॉलिश लावली. सुनेने याला विरोध केला असता कुटुंबीयांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर संतापलेली सून कुटुंबीयांशी भांडण करून माहेरी निघून गेली. तसेच सुनेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी शनिवारी दोन्ही पक्षांना कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समुपदेशनासाठी बोलावण्यात आलं होतं. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, समुपदेशनानंतर ती तिच्या पतीसोबत राहण्यास तयार आहे, परंतु तिची एक अट आहे की ती सासूसोबत राहणार नाही. सासू तिचा छळ करत असल्याचं महिलेने सांगितलं. तर दुसरीकडे नवऱ्याने हा वाद केवळ नेलपॉलिश लावण्यावरून झाल्याचं म्हटलं आहे. दोघांनाही पुढील तारखेला बोलावण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रकाबगंज येथील रहिवासी असलेल्या तरुणाचं लग्न शाहगंज भागात राहणाऱ्या तरुणीशी 2021 मध्ये झालं होते. बायकोला नेलपॉलिश लावण्याची आवड आहे. पतीने समुपदेशकाला सांगितलं की, तिच्या या आवडीमुळे त्याने पत्नीसाठी 60 प्रकारच्या नेलपॉलिश विकत घेतल्या होत्या. 

एके दिवशी आईने पत्नीसाठी आलेली नेलपॉलिश तिला न विचारता लावली. या प्रकरणावरून पत्नीने घरात गोंधळ घातला. आईशी भांडू लागली. ही किरकोळ बाब असल्याचं त्याने पत्नीला समजावून सांगितलं. तसेच तिला तो नवीन आणून देईल असंही सांगितलं. आईने नेलपॉलिश लावली तर काय़ झालं? असा प्रश्न विचारला तेव्हा पत्नी नाराज झाली आणि निघून गेली.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, पती नेहमीच फक्त आईची बाजू घेतो. त्यामुळे ती माहेरी निघून गेली. तसेच सासूने तिचं जगणं अवघड केलं आहे. सासू वेळोवेळी तिला त्रास देते. टोमणे मारते. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत राहण्यास तयार आहे पण सासूसोबत राहणार नाही. जर पतीला एकत्र राहायचे असेल तर त्याला वेगळं राहावं लागेल. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.