शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीर भाजप कार्यकर्ते, त्यांना नोकऱ्या का द्यायच्या? ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:10 IST

सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते.

कोलकाता : अग्निवीर हे भाजप कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक उल्लेख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या भाजप कार्यकर्त्यांना राज्यांनी नोकऱ्या का द्यायच्या असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. 

सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की भाजप कार्यकर्त्यांना आम्ही नोकऱ्या का द्यायच्या ? त्यापेक्षा आमच्या राज्यातील युवकांना नोकऱ्यांमध्ये राज्य सरकार प्राधान्य देईल. 

त्यांनी म्हटले आहे की, सैन्यदलामध्ये केंद्र सरकार अग्निवीरांना फक्त चार वर्षे सेवा बजावण्याची संधी देणार आहे. त्यानंतर या अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी केंद्र सरकार राज्यांवर ढकलणार हे योग्य नाही. नोकरीची गरज असलेल्या युवकांची पश्चिम बंगालमध्ये कमतरता नाही. आम्ही या युवकांचा  नोकऱ्यांसाठी प्राधान्याने विचार करू.

निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना केंद्र सरकारकडून राबविली जाईल असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. अग्निपथ योजना विरोधात देशभरात निदर्शने झाली होती. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले होते. अग्निपथ योजनेबाबत विरोधकांनीही चिंता व्यक्त केली होती. मात्र अग्निवीरांनी चार वर्षे सेनादलात सेवा बजावल्यानंतर त्यांना नोकऱ्या देण्याची तयारी भाजपची सत्ता असलेल्या हरयाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी दाखविली आहे.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी