शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीरांसाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 08:45 IST

anand mahindra : चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने (Agnipath Scheme Protest) सुरू आहेत. दरम्यान, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. १४ जून रोजी अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली होती, तेव्हापासून सातत्याने हिंसक निदर्शने होत आहेत. योजनेत पेन्शन रद्द करण्यात आली आहे, तर सेवा केवळ चार वर्षांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना योग्य नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.  याबाबत आनंद महिंद्रा म्हणाले, "अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आणि निराश झालो आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता, तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीरला मिळणारी शिस्त आणि कौशल्ये त्याला उल्लेखनीयपणे रोजगार सक्षम बनवतील. महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना आमच्यासोबत भरती (नोकरी) करण्याची संधी देईल."

आनंद महिंद्रा यांना असेही विचारण्यात आले की, ते अग्निवीरांना कंपनीत कोणते पद देणार? त्यावर त्यांनी लिहिले की, "लीडरशिप क्वॉलिटी, टीम वर्क आणि शारीरिक प्रशिक्षणामुळे अग्निवीरच्या रूपाने इंडस्ट्रीला बाजारपेठेसाठी तयार व्यावसायिक मिळेल. हे लोक अॅडमिनिस्ट्रेशन, सप्लाय चेन मॅनेजमेंटची कामे कुठेही करू शकतात."

दरम्यान, लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले. सैन्य विभागाचे अवर सचिव लेफ्टनंट जनरल ए. पुरी यांनी स्पष्ट केले की, ही योजना लागू करण्याच्या दिशेने सरकार पुढे पावले टाकत आहे. 

पुरी म्हणाले की, सशस्त्र दलांतील वय कमी करण्यावर दीर्घकाळापासून विचार सुरु होता. कारगिल समीक्षा समितीनेही यावर टिप्पणी केली होती. नौदलाच्या योजनेची माहिती देताना व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, नौदल मुख्यालय २५ जूनपर्यंत भरतीसाठी दिशानिर्देश जारी करील. पहिली बॅच २१ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू करील. 

हिंसाचारात सहभागींना तिन्ही सेवांची दारे बंदलेफ्टनंट जनरल ए. पुरी म्हणाले की, अग्निवीरांबाबत जे नवे निर्णय घेण्यात आले ते हिंसाचारानंतर घेतलेले निर्णय नाहीत. सरकार पूर्वीपासूनच त्यावर विचार करत होते. या हिंसाचारात जे तरुण सहभागी आहेत त्यांना सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्यांना भरती प्रक्रियेत यायचे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यावे लागेल की, ते अशा कोणत्याही हिंसाचारात सहभागी नव्हते. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाAnand Mahindraआनंद महिंद्रा