शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अग्नी-5ची लवकरच चाचणी; संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 16:23 IST

भारताच्या पहिल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची लवकरच चाचणी

नवी दिल्ली: पोखरणमध्ये 20 वर्षांपूर्वी अणूचाचणी करुन जगाला आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. दोन दशकानंतर आता पुन्हा भारत आपल्या ताकदीचं दर्शन संपूर्ण जगाला घडवणार आहे. भारताकडूनच लवकरच अग्नी-5चं अनावरण केलं जाईल. हे भारताचं पहिलंच आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असेल. या क्षेपणास्त्राचा समावेश स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडच्या (एसएफसी) अंतर्गत करण्यात येईल.5 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या अग्नी-5 ची यंत्रणा आणि उपयंत्रणा एसएफसीकडे सोपवण्यात आल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण चीन या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असणार आहे. यासोबतच युरोप आणि आफ्रिका खंडातील काही भागदेखील या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असतील. 'अग्नी-5 ची दुसरी चाचणी लवकरच होणार आहे. या चाचणीची तयारी पूर्ण झाली आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 18 जानेवारीला झाली होती. एप्रिल 2012 नंतर यामध्ये चारवेळा सुधारणा करण्यात आली आहे,' अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे (एसएफसी) आधीपासून अनेक त्रिस्तरीय क्षेपणास्त्र आहेत. यामध्ये पृथ्वी-II (350 किमी.), अग्नि-I (700 किमी.), अग्नि-III (3,000 किमी) यांचा समावेश आहे. यासोबतच सुखोई-30 एमकेआय, मिराज-2000 आणि जॅग्वार ही लढाऊ विमानं अण्वस्त्र हल्ले करण्यात सक्षम आहेत.  

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग