नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण सिद्धतेत आज एक नवा अध्याय जोडला गेला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या मध्यम पल्ल्याच्या 'अग्नी प्राइम' (Agni Prime) क्षेपणास्त्राची रेल्वे-आधारित मोबाईल लाँचर प्रणालीतून (Rail-based Mobile Launcher System) यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीमुळे आता धावत्या ट्रेनमधूनही हे क्षेपणास्त्र सहजपणे डागणे शक्य होणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती दिली. रेल्वे नेटवर्कवरून मिसाईल प्रक्षेपित करण्याची क्षमता असणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या समूहात भारताचा समावेश झाला आहे.
२ हजार किमीचा पल्ला, कमी वेळेत प्रक्षेपण
क्षमता: 'अग्नी प्राइम' हे पुढील पिढीचे क्षेपणास्त्र असून ते २ हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.
चाचणीची खास बाब: हे प्रक्षेपण एका खास डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित मोबाईल लाँचरमधून करण्यात आले. हे लाँचर कोणत्याही पूर्वतयारीशिवाय रेल्वे नेटवर्कवर धावण्याची क्षमता ठेवते.
सामरिक महत्त्व: या प्रणालीमुळे युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत कमी वेळेत क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्याची क्षमता मिळाली आहे.आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेली भूमिका
'अग्नी प्राइम' हे क्षेपणास्त्र नवीन प्रोपल्शन प्रणाली, प्रगत नेव्हिगेशन (Advanced Navigation) आणि मार्गदर्शन प्रणाली (Guidance System) यांसारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. हे 'कॅनिस्टर-लाँच' प्रणालीवर आधारित असल्याने आवश्यकतेनुसार यास रेल्वे किंवा रस्त्याच्या मार्गाने सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते.
अग्नी-I ची जागा घेणारस्ट्रॅटेजिक फोर्स कमांड (SFC) द्वारे आयोजित करण्यात आलेली ही 'अग्नी प्राइम'ची पहिली प्री-इंडक्शन रात्रीची चाचणी होती. हे क्षेपणास्त्र टप्प्याटप्प्याने 'एसएफसी'च्या शस्त्रागारातील जुन्या 'अग्नी-I' (७०० किमी रेंज) क्षेपणास्त्रांची जागा घेणार आहे. तसेच, पाकिस्तानसह इतर कोणत्याही धोक्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठी याची रणनीतिक रचना करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या महत्त्वपूर्ण यशस्वी कामगिरीबद्दल डीआरडीओ, स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आहे.
Web Summary : India successfully tested Agni Prime missile from a rail-based mobile launcher, enhancing defense capabilities. The missile, with a 2,000 km range, can be launched quickly from a moving train, joining a select group of nations. It will replace Agni-I.
Web Summary : भारत ने रेल-आधारित मोबाइल लांचर से अग्नि प्राइम मिसाइल का सफलतापूर्वक परीक्षण किया, रक्षा क्षमताओं को बढ़ाया। 2,000 किमी की रेंज वाली यह मिसाइल चलती ट्रेन से तेजी से लॉन्च की जा सकती है, जिससे भारत कुछ चुनिंदा देशों में शामिल हो गया है। यह अग्नि-I की जगह लेगी।