शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath Scheme: "सुरुवात खराब दिसू शकते, परंतु..."; 'अग्निपथ' वादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:03 IST

अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहे.

नवी दिल्ली - देशात केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेवरून बरेच वादंग निर्माण झाले आहेत. या योजनेच्या निषेधार्थ देशातील अनेक राज्यांत हिंसक आंदोलन पेटले. रेल्वे जाळल्या, बसेसची तोडफोड झाली. जवळपास २०० कोटींच्या राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झाल्याचं समोर आलं. या सर्व वादावर अखेर बंगळुरू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी भाष्य केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने मागील ८ वर्षात स्पेस आणि डिफेन्स क्षेत्राची दारे युवकांसाठी उघडली आहेत. रिफॉर्मचा मार्गच आपल्याला नवीन लक्ष्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अनेक वर्षापासून या क्षेत्रात एकाधिकारशाही होती. ड्रोनपासून इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही युवकांना संधी दिली. सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवले. त्याठिकाणी युवकांनी आयडिया दिल्या. सुरुवात जरी खराब दिसत असली तरी आगामी काळात त्याचे खूप फायदे होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 

 

त्याचसोबत खासगी असो वा सरकारी उपक्रम दोन्हीही देशासाठी ऐसेट आहे. त्यासाठी लेवल प्लेयिंग फिल्ड सर्वांना समान मिळायला हवी. मागील ८ वर्षात १०० हून अधिक बिलियन डॉलर कंपन्या उभ्या राहिल्या. ज्यात दरमहिन्याला नवीन कंपन्या जोडल्या गेल्या. स्टार्टअपच्या जगात भारत वेगाने प्रगती करत आहे. आतापर्यंत हजारो कोटी व्यवसाय झाला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी जवळपास २७ हजार कोटींच्या विविध योजनांना कर्नाटकात हिरवा कंदील दाखवला. बंगळुरू येथे उपनगरीय रेल्वे योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. दुसरीकडे बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचं उद्धाटन झाले. बंगळुरूला वाहतूक कोडींतून मुक्त करण्यासाठी रेल्वे, रोड, मेट्रो, अंडरपास, फ्लायओव्हर प्रत्येक योजनेत सरकार काम करत आहे. बंगळुरूच्या उपनगरीय भागाला जोडण्यासाठी सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध आहे असं मोदींनी सांगितले. 

 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाNarendra Modiनरेंद्र मोदी