शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ऐकावं ते नवलच! वय फक्त 24 वर्षे, वार्षिक कमाई 58 लाख; तरीही आनंदी नाही; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:53 IST

24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पैसे आणि एकटेपणाबद्दल सोशल मीडियावर एक नोट लिहिली आहे.

'पैशातून आनंद विकत घेता येतो का?' यावर वर्षानुवर्षे चाललेल्या चर्चेला अद्याप योग्य उत्तर मिळालेले नाही कारण या प्रश्नावर लोकांची भिन्न मते आहेत. याच दरम्यान, बंगळुरू येथील 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पैसे आणि एकटेपणाबद्दल सोशल मीडियावर एक नोट लिहिली आहे. तो सांगतो की तो वर्षाला 58 लाख रुपये कमावतो आणि तरीही एकटा आहे आणि हताश जीवन जगतो आहे.

आपली गोष्ट शेअर करताना त्याने लिहिले, "मला आयुष्यात खूप कंटाळा येत आहे. मी FAANG कंपनीत 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असून बंगळुरूमध्ये 2.9 वर्षांचा अनुभव आहे. मी 58 लाख कमावतो आणि काहीसे आरामात काम करतो. तथापि, मी माझ्या आयुष्यात नेहमीच एकटा असतो. माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी माझी एक मैत्रीण नाही आणि माझे इतर सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत."

"माझे कामकाजाचं जीवन देखील नीरस आहे कारण मी माझ्या करियरच्या सुरुवातीपासून एकाच कंपनीमध्ये आहे आणि दररोज मी त्यातच व्यस्त असतो. आता मी नवीन आव्हाने आणि कामाच्या वाढीच्या संधींची अपेक्षा करत नाही. कृपया माझे जीवन अधिक मनोरंजक बनवण्यासाठी मी काय करावे याबद्दल सल्ला द्या." त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपले मत मांडले आहे. 

एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं की, “माझ्या काही मित्रांनी मला हेच सांगितले आणि मलाही ते अनेकदा जाणवले. एकटेपणा, कंटाळा, चिंताग्रस्त वाटणे." दुसर्‍या युजरने लिहिले, "संघर्ष खरा आहे." तिसऱ्याने लिहिले, "तो एकाकी आहे आणि ह्युमन कनेक्शन तळमळत आहे. आणि पगाराची पर्वा न करता या सर्व गोष्टी आता आवश्यक वाटतात. एकाकीपणा हा आधुनिक जीवनाचा शाप आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके