शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

"हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात," ओवेसींनी केला आधार-व्होटर कार्डला जोडण्याच्या निर्णयाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 11:19 IST

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांनी आधार कार्डाला मतदान ओळखपत्राशी जोडण्यासाठी आणण्यात आलेल्या विधेयकाचा विरोध केला आहे. तसंच हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात असल्याचं म्हटलंय.

केंद्र सरकार नागरिकांच्या आधार कार्डना त्यांच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याच्या विचारात आहे. सरकारच्या या निर्णयावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आक्षेप घेतला आहे. ओवेसी यांनी हा मुद्दा नागरिकांच्या सुरक्षा आणि वैयक्तीक बाबींशी जोडला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ओवेसी यांनी नोटिस देत नव्या इलेक्शन लॉ (सुधारणा) विधेयक २०२१ चा विरोध केला आहे. 

New Election Laws (Amendment), Bill 2021 नुसार मतदान ओळखपत्राला आधार कार्डाशी लिंक करण्याची तयारी केली जात आहे. यामुळे दोन मतदान ओळखपत्र ठेवण्यासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल असंही म्हटलं जात आहे. आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र एकत्र जोडण्याचे अनेक धोके असल्याचंही त्यांनी म्हटलं.

आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र एकत्र जोडण्याचे अनेक धोके आहेत. यामध्ये नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या खासगी बाबींना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सरकारांना जनतेवर दबाव निर्माण करण्याचा, मताधिकारापासून वंचित ठेवण्याचा आणि भेदभाव करण्याचा अधिकार मिळणार आहे. तसंच यामुळे सिक्रेट बॅलेट, फ्री आणि फेअर इलेक्शनमध्येही बाधा निर्माण होईल, असा दावा ओवेसी यांनी पत्राद्वारे केला.न्यायालयाच्या आदेशाविरोधातओवेसी यांनी हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात असल्याचे म्हटलं. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचं (पुत्तस्वामी विरुद्ध भारत संघ) उल्लंघन करतं. असं करणं म्हणजे गोपनीयतेच्या मुलभूत अधिकाराचं उल्लंघन असल्याचंही त्यांनी म्हटलं.

काय आहे विधेयकात ?केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात बुधवारी एका विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यात, बोगस मतदान आणि मतदार यादीत दुहेरी नाव येणे रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे आणि एकच मतदार यादी तयार करणे आदी निर्णयांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या विधेयकात सर्व्हिस व्होटर्ससाठी निवडणूक कायद्यांना 'जंडर न्यूट्रल'देखील बनवण्यात येईल. याशिवाय, तरुणांना आता वर्षातून चार वेगवेगळ्या तारखांना मतदार म्हणून नावनोंदणीही करता येईल, अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदAdhar Cardआधार कार्ड