शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

योगींनंतर आता RSS ने उचलला मुद्दा, हैदराबादचा उल्लेख 'भाग्यनगर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 11:02 IST

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करण्याचा मुद्दा उचलला होता

ठळक मुद्देविशेष ठिकाणांना त्यांच्या जुन्या नावानेच ओळखले जावे किंवा देशातील आदर्श व्यक्तींचे नाव त्या स्थळाला असावे, असेही अलोक कुमार यांनी म्हटले. त्यामुळेच, आम्ही हैदराबादला भाग्यनगर असे संबोधत असून हैदराबादचे नाव भाग्यनगर व्हावे, ही आमची इच्छा आहे.  

हैदराबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने हैदराबाद शहराच्या नामांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आरएएसएसच्या अधिकृता ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये यावेळी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा करण्यात आला आहे. पुढील महिन्यात आरएसएसशी संलग्नित संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यासंदर्भात हे ट्विट करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवस संघाच्या समन्वयक बैठकीची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर करण्यात आला असून कंसात हैदराबाद असे लिहिण्यात आले आहे. पुढील महिन्यात 5 ते 7 जानेवारी 2022 तेलंगणातील हैदराबाद येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.  हैदराबाद महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करण्याचा मुद्दा उचलला होता. त्यानंतर, गृहमंत्री अमित शहा यांनीही हैदराबादचे भाग्यनगर करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. योगींनी हैदराबादमधील सभेत बोलताना, फैजाबादचे अयोध्या आणि इलाहाबादचे प्रयागराज असे नामांतर केल्याचा दाखला देत हैदराबादचे भाग्यनगर करण्यात येईल, असे म्हटले होते. 

दरम्यान, यापूर्वी दिल्लीच्या औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. अब्दुल कलाम मार्ग असे ठेवण्यात आले आहे. व्हीएचपीचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी म्हटले की, विशेष ठिकाणांना त्यांच्या जुन्या नावानेच ओळखले जावे किंवा देशातील आदर्श व्यक्तींचे नाव त्या स्थळाला असावे, असेही अलोक कुमार यांनी म्हटले. त्यामुळेच, आम्ही हैदराबादला भाग्यनगर असे संबोधत असून हैदराबादचे नाव भाग्यनगर व्हावे, ही आमची इच्छा आहे.   

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघyogi adityanathयोगी आदित्यनाथhyderabad-pcहैदराबाद