शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

तृणमूल-भाजपच्या संघर्षामुळे संसार मोडणार?; पत्नीला तलाक देणार भाजप खासदार

By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 4:34 PM

भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल तृणमूलमध्ये

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहांनी नुकताच राज्याचा दौरा केला. या दरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.भाजपनं तृणमूलचे अनेक आमदार गळाला लावल्यानंतर आता तृणमूलनं भाजपच्या घरात सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी आज तृणमूलमध्ये प्रवेश केला. सौमित्र लोकसभेत बिशुनपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. पत्नीनं तृणमूलमध्ये प्रवेश करताच सौमित्र यांनी तलाकची तयारी सुरू केली आहे. पती भाजपचे खासदार असतानाही तृणमूलमध्ये प्रवेश करत असल्याचं कारण सुजाता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 'मी दलित समाजातील एक महिला आहे. भाजप आणि माझ्या पतीसाठी मी संघर्ष केला. आम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि आम्ही निवडणूक जिंकलो. मात्र आता भाजपमध्ये केवळ संधीसाधूंची भरती सुरू आहे,' अशा शब्दांत सुजाता यांनी भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या जोरदार इनकमिंगवर निशाणा साधला.भाजपच्या गोटात ममता बॅनर्जींचा सर्जिकल स्ट्राईक; खासदाराची पत्नी तृणमूलमध्ये'ज्यावेळी भाजपचे राज्यात केवळ २ खासदार होते, त्यावेळी आम्ही पक्षासोबत ठामपणे उभे होतो. पक्ष २ वरुन १८ वर पोहोचले हेदेखील त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं. आमच्याकडे कोणताहा बॅकअप नसताना आम्ही लढलो आणि जिंकलो. मात्र तरीही पक्षात मला कोणताही सन्मान मिळाला नाही,' असं सुजाता म्हणाल्या.सुजाता यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करताच सौमित्र खान यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सुजाता यांना तलाक देण्याची तयारी सुरू केली आहे. सुजाता यांच्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. सुजाता आणि सौमित्र यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज तो समोर आल्याचं बोललं जात आहे. यावर सौमित्र यांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'आमच्या कुटुंबात मतभेद होते. कुटुंबात थोडे वाद असूच शकतात. मला त्याला राजकीय रंग द्यायचा नाही. सुजाता तृणमूलमध्ये सामील झाल्या याबद्दल मला दु:ख वाटतं,' असं सौमित्र म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस