शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपयशांनंतर यूपीत तिसऱ्यांदा प्लॅस्टिकबंदी! १५ जुलैपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 01:48 IST

महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही आता प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

लखनौ : महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही आता प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.या घोषणेमुळे १५ जुलैनंतर उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकच्या पिशव्या, कप व ग्लास यावर बंदी येणार आहे. त्यांचा वापर आतापासूनच थांबवावा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी येथील वन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.स्वत:च्या शरीराचे स्वास्थ्य टिकविण्याबरोबरच पृथ्वीचे आरोग्य टिकविण्याची जबाबदारीही आपली आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्लॅस्टिकवर बंदी घालणे गरजेचे आहे, असे सांगतानाच उत्तर प्रदेशातील जवळपास सर्व नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा साचला आहे. तो काढण्यात अडचणी येत आहेत आणि तो अडकून राहिल्यामुळे नद्यांना पूर येत आहेत, नद्यांचे पाणी गावांमध्ये व शेतात शिरून आपले नुकसान होत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.योगी आदित्यनाथ यांनी १५ जुलैपासून प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी यापूर्वी दोनदा उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली होती. तिची नीट अंमलबजावणी करण्यात आली नाही. सर्वात आधी २0१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही बंदी घातली होती.त्यानंतरही राज्यात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, २0१६ साली त्यांनी पुन्हा प्लॅस्टिकबंदी जाहीर करताना, त्यासाठी कडक नियम ठरवून दिले, परंतु त्याचा परिणाम अद्यापझाला नसल्याने योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा बंदी घातलीआहे. (वृत्तसंस्था)२५ राज्यांत बंदीदेशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या प्लॅस्टिकवर बंदी आहे. सर्वात आधी सिक्किम राज्यात त्यावर बंदी घालण्यात आली आणि तिथे ती यशस्वी झाली आहे. काही राज्यात प्लॅस्टिकवर बंदी घातली असली, तरी त्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली नाही, तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घातलेली बंदी अंशत: आहे. म्हणजेच काही प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास राज्यात संमती आहे. केरळने समुद्रातील प्लॅस्टिकचा वापर रस्तेबांधणीसाठी सुरू केला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी