शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

"प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध"; वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 08:35 IST

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

PM Modi on Waqf Amendment Bill 2025: बुधवारी मध्यरात्री लोकसभेत वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ एवढी मतं पडली. अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले होते. त्यानंतर गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतरीत होणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ विधेयकावर भाष्य केलं आहे.

"संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर करणे हे सामाजिक-आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि समावेशक विकासाच्या आपल्या सामूहिक प्रयत्नात एक महत्त्वाचा भाग आहे. हे विशेषतः अशा लोकांना मदत करेल जे दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिले आहेत, ज्यांना संधी मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. संसदीय आणि समितीच्या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व खासदारांचे आभार, ज्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आणि हे कायदे मजबूत करण्यात योगदान दिले. संसदीय समितीकडे आपल्या बहुमोल सूचना पाठवणाऱ्या असंख्य लोकांचेही विशेष आभार. पुन्हा एकदा, व्यापक वादविवाद आणि संवादाचे महत्त्व पटले आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

"अनेक दशकांपासून वक्फच्या व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव होता. यामुळे विशेषत: मुस्लिम महिला, गरीब मुस्लिम आणि पसमांदा मुस्लिमांचे नुकसान झाले. संसदेने संमत केलेले कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचे संरक्षण करतील. आपण आता अशा युगात प्रवेश करू जिथे फ्रेमवर्क अधिक आधुनिक आणि सामाजिक न्यायासाठी संवेदनशील असेल. व्यापकपणे सांगायचे तर, आम्ही प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत. अशा प्रकारे, आपण एक मजबूत, अधिक समावेशक आणि अधिक दयाळू भारत देखील तयार करू शकतो," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, गुरुवारी राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर ९५ खासदारांनी विरोध केला. यापूर्वी लोकसभेत या विधेयकाला २८८ खासदारांचा पाठिंबा मिळाला होता. तर २३२ जणांनी विरोधात मतदान केले होते. वक्फ मालमत्तेचे प्रशासन आणि व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने  मोदी सरकारने हे विधेयक आणले आहे. मात्र यावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षांनी विधेयकाला अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या विरोधात म्हटलं आहे. तर सरकारने हे पारदर्शकता आणि सुशासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदAmit Shahअमित शाह