शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील विजयानंतर तेलंगणात काँग्रेस ॲक्टीव्ह! 5G फॉर्म्युलावर करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 16:31 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी १७ सप्टेंबर रोजी रॅलीसाठी येणार आहेत.

काँग्रेसने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. आता काँग्रेसने तेलंगणातील विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जाहीर सभा आयोजित केली असून या सभेसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. तेलंगणातील  जनतेसाठी पाच 'गॅरंटी' (5G) जाहीर करणार' असल्याची माहिती काँग्रेस तेलंगणा युनिटचे अध्यक्ष आणि खासदार ए रेवंत रेड्डी यांनी दिली. 

भारताचा चीनला झटका! लडाखच्या न्योमामध्ये बांधणार जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड

रेड्डी म्हणाले, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सभेत पाच 'गॅरंटी' जाहीर करतील. १७ सप्टेंबर रोजी निवडणूक हमीपत्र जाहीर करणार आहेत.

पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक १६ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे होणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले आहे. १७ सप्टेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे, यामध्ये सर्व प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख सहभागी होणार आहेत.

१७ सप्टेंबर रोजी तेलंगणाचे विलीनीकरण झालेतेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने एकूण ११९ विधानसभा जागांपैकी ११५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. १७ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक कार्यक्रम पाहिले जाऊ शकतात, कारण याच दिवशी १९४८ मध्ये, हैदराबादचे पूर्वीचे संस्थान निजाम राजवटीत भारत संघात विलीन झाले होते. हा दिवस साजरा करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी हैदराबादमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे मानले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथे केंद्राने आयोजित केलेल्या 'मुक्ती दिना'च्या अधिकृत कार्यक्रमात भाग घेतला होता आणि यावर्षीही ते तेलंगणाच्या राजधानीत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तेलंगणा शेतकरी सशस्त्र संघर्ष (१९४६-५१) च्या स्मरणार्थ ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षाचे नेतृत्व कम्युनिस्ट नेत्यांनी केले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी