शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:28 IST

Congress News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसने आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. तसेच इंडिया आघाडीसोबत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले होते. तसेच मागच्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत जागांची संख्या दुपटीने वाढून ९९ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास पक्षाने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत  स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. ज्या राज्यांमधील काँग्रेसच्या नेत्यांना इंडिया आघाडी कायम राहावी, असं वाटेल, तिथे आघाडी कायम राहिली.

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोघेही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांनी दिल्ली आणि हरियाणामध्ये एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. दरम्यान, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका नियोजित आहेत.  

पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी कायम राहील का असं विचारलं असता जयराम रमेश यांनी सांगितलं की, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. महाराष्ट्रामध्येही विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. तर पंजाबमध्ये इंडिया आघाडी नाही आहे. हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा आम आदमी पक्षाला दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहील, असं मला वाटत नाही. दिल्लीमधील आपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होणार नाही, असं विधान केलं होतं, असे जयराम रमेश यांनी सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसAAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीHaryanaहरयाणाdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024