शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर, भारतानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अ‍ॅडव्हायजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 15:21 IST

महत्वाचे म्हणजे, अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला आहे. 

इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष पेटल्यानंतर आता, भारत सरकारने अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारताने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, इस्रायलच्या स्थानिक अधिकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्लाही भारत सरकारने दिला आहे. 

महत्वाचे म्हणजे, अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला आहे. 

इस्रायलच्या लोकांना घरातच राहण्याचे आदेश -सीएएनएनच्या वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागांत सायरन वाजले. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेल अवीवमध्ये संरक्षण दलाच्या मुख्यालयात सुरक्षेसंदर्भात मूल्यमापन करत आहेत. या शिवाय, इस्रायलने आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत.

आम्ही इस्रायलच्या पाठीशी - अमेरिका -हमासच्या या हल्ल्याविरोधात इस्रायलने 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स'ची घोषणा केली आहे. हमासने गंभीर चूक केल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. दक्षिण इस्रायलमध्ये 21 ठिकाणी हमासच्या घुसखोर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. या सर्व घडामोडी पाहून अमेरिकेने आपण इस्रायलसोबत उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायलमधील हमास हल्ल्याचे जे फोटो, व्हिडीओ येत आहेत. यामध्ये मृत आणि जखमी झालेल्या लोकांना पाहून विचलित होत आहे. या घटनेत आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे अमेरिकेच्या यूएस चार्ज अफेयर्सने म्हटले आहे. 

तत्पूर्वी, आपण इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट हल्ले  केले असल्याचे हमासने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपण इस्रायली कब्जाच्या विरोधात "ऑपरेशन अल-अक्सा फ्लड" सुरू केले आहे, अशी घोषणाही हमासने केली आहे. यानंतर, आपणही युद्धासाठी तयार आहोत, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. लष्कराने आपल्या सैन्यासाठी 'रेडिनेस फॉर वॉर'चा अलर्टदेखील जारी केला आहे. तसेच, गजामध्ये शिक्षण मंत्रालयाने आज सर्व शाळांना सुट्टी दिली आहे.

 

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध