शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

मृत मुलगा जिवंत राहण्यासाठी लष्कराच्या जवानाने घेतला असा निर्णय; वाचले अनेकांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:37 IST

भारतीय सैन्यातील हवालदाराने मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान करत सहा जणांना नवजीवन दिलं आहे.

Organ Donation: अवयव दान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे म्हटलं जातं. अवयव दान करणारी व्यक्तींच्या कहाण्या देखील अनेकदा प्रेरणादायी असतात. एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात वेदना देणारा क्षण एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणं हा असतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेते तेव्हा जास्त त्रास होतो. भारतीय लष्कराच्या एका सैनिकाने या दोन्ही वेदना एकत्र पाहिल्या आणि सहन केल्या आहेत. मुलाच्या अकाली मृत्यूनंतर लष्कराच्या एका हवालदाराने अवयवदानाचे पाऊल उचलून माणुसकीचे एक उदाहरण तयार करत सहा जणांना जीवनदान दिलं आहे.

भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटच्या १० व्या बटालियनचे हवालदार नरेश कुमार यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करून अनेक गरजूंना मदत केलीय. या निर्णयातून त्यांचे धैर्य, निःस्वार्थ सेवा आणि मानवता दिसून येतेय. रस्ते अपघातात मुलगा गमावल्यानंतरही नरेश कुमार यांनी हिंमत दाखवली आणि अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यकृत, किडनी, स्वादुपिंड आणि कॉर्निया दान करून त्यांनी आपल्या मुलाच्या आठवणी जिवंत ठेवत गरजूंना जीवनदान दिलं.

८ फेब्रुवारी रोजी, हवालदार नरेश कुमार यांचा मुलगा अर्शदीप सिंह याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. १८ वर्षांचा मुलाचा जीव जाणं हे नरेश कुमार यांच्यासाठी जगातील कोणत्याही दुःखापेक्षा मोठं होतं. मात्र यानंतरही न खचता नरेश कुमार यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. १६ फेब्रुवारी रोजी त्यांनी अर्शदीपचे यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि कॉर्निया दान करण्यास सहमती दर्शवली. अर्शदीपचे यकृत आणि मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉरमधून नवी दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. एका रुग्णाला किडनी आणि स्वादुपिंड देण्यात आले. जो  मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आजाराने बराच काळ ग्रस्त होता. 

अर्शदीपचे कॉर्निया गरजूंसाठी जतन करुन ठेवण्यात आलं आहे. चंडीमंदिर येथील कमांड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ पथकाने ही प्रक्रिया पार पाडली. हे रुग्णालय अवयव प्रत्यारोपण आणि अवयव दानासाठी ओळखले जाते. हवालदार नरेश कुमार यांनी घेतलेला हा निर्णय सहा जणांना नवजीवन देणार आहे. 

टॅग्स :Organ donationअवयव दानIndian Armyभारतीय जवानdelhiदिल्ली