शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांनी 'या' राजकीय नेत्याला केला होता पहिला फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 9:47 AM

श्रीदेवी एखादवेळी बोनी कपूर यांचे म्हणणे टाळत, पण माझा सल्ला त्या नेहमी ऐकत, असेही अमरसिंह यांनी सांगितले.

नवी दिल्ली: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूनंतर गेल्या काही तासांमध्ये या प्रकरणाने रंजक वळण घेतले आहे. कालपासून या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामध्ये आता राजकीय चमत्कारांसाठी विख्यात असणारे समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला तेव्हा बोनी कपूर यांनी मला फोन केला होता. मात्र, तेव्हा मोबाईल सायलंटवर असल्यामुळे मी त्यांचा फोन उचलला नाही. माझ्या मते त्यांनी सर्वात पहिला फोन मलाच केला असावा. मी मोबाईल उचलत नसल्यामुळे त्यांनी माझ्या घरच्या लँडलाईनवर फोन केला. तो फोन उचलल्यानंतर बोनी कपूर यांनी मला श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल सांगितले. परंतु परिस्थितीच अशी होती की, आम्ही पुढे फार काही बोलू शकलो नाही, असे अमरसिंह यांनी म्हटले. अमरसिंह हेदेखील मोहित मारवाह यांच्या विवाह सोहळ्याला दुबईत गेले होते. मात्र, लखनऊतील एका कार्यक्रमात हजेरी लावायची असल्याने हे दोघेही भारतात परतले होते. त्यामुळे श्रीदेवी दुबईत एकट्याच होत्या. मात्र, आता असे वाटतेय की, आम्ही तिकडे थांबलो असतो तर ही घटना टळू शकली असती. मात्र, मी यासाठी कोणालाही दोषी धरू इच्छित नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, श्रीदेवी यांच्या रक्तात मद्याचा अंश आढळून आल्याबद्दल विचारणा केली असता अमरसिंह यांनी म्हटले की, श्रीदेवी कधीतरी थोड्या प्रमाणात मद्यप्राशन करायच्या. परंतु, त्या कधीही मद्याचे अतिसेवन करत नसत, असे अमरसिंह यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी श्रीदेवी यांच्या शवविच्छेदनानंतर न्यायवैद्यक शाळेने दिलेल्या अहवालात त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे म्हटले आहे. यानंतर स्थानिक पोलिसांकडून हॉटेलमधील कर्मचारी आणि बोनी कपूर यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. 

टॅग्स :Srideviश्रीदेवीbollywoodबॉलिवूडBonnie Kapoorबोनी कपूर