शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

'हमे चैन से जीने दे', साक्षीनंतर आता भाजपा नेत्याच्या नातीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 13:14 IST

दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजपा नेत्याच्या नातीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

ठळक मुद्देप्रयागराजचे माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल यांची नात दीक्षा अग्रवालने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. दीक्षाने काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी लग्न केले होते दीक्षाने आपला पती आणि सासरच्या मंडळींना काही झालं तर त्यासाठी आजोबा आणि इतर लोक जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

प्रयागराज - दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजपा नेत्याच्या नातीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कुटुंबीयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा मुलीने केला आहे. भाजपाचे नेते आणि प्रयागराजचे माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल यांची नात दीक्षा अग्रवालने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. 

दीक्षा अग्रवालने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे घरच्या मंडळींपासून जीवाला धोका असल्याचं तिने म्हटलं आहे. दीक्षाने काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांच्यापासून धोका असल्याचं तिने व्हिडीओत म्हटलं आहे. तसेच दीक्षाने आपला पती आणि सासरच्या मंडळींना काही झालं तर त्यासाठी आजोबा आणि इतर लोक जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

 दीक्षाच्या कुटुंबीयांनी प्रयागराजमधील पोलीस ठाण्यात तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल केली आहे. 'माझं नाव दीक्षा अग्रवाल राजपूत आहे. मी 5 जुलै 2019 रोजी ऋतुराज सिंह राजपूत याच्याशी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. ऋतुराजसोबत मी खूश आहे. आजोबा माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल, पवन अग्रवाल आणि इतर नातेवाईकांना माझी विनंती आहे की पोलीस प्रशासन व राजकीय ताकद वापरून त्रास देणं थांबवा. मी माझ्या पतीसोबत आनंदात राहू इच्छिते. माझ्यासोबत जर काही चुकीचं झालं तर त्याला घरचे लोक जबाबदार असतील' असं दीक्षाने व्हिडीओत म्हटलं आहे. 

'पापा मुझे शांति से जीने दो', दलित मुलाशी लग्न केलेल्या भाजपा आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने व्हिडीओच्या माध्यमातून वडिलांकडून जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. तसेच कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचं तिने म्हटलं होतं. राजेश मिश्रा हे भाजपाचे आमदार आहेत. साक्षीने काही दिवसांपूर्वी पळून जाऊन अजितेश कुमार या दलित तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांनी तिला मारायला गुंड पाठवल्याच साक्षीने व्हिडीओत म्हटलं होतं. अजितेशच्या नातेवाईकांना देखील त्रास देत असल्याचं सांगितलं. 

'पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. आमचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या. भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा' असंही साक्षीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी साक्षीने केली होती. 

 

टॅग्स :BJPभाजपा