शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

४८, ७० की ९०...भारतात किती तास काम करण्याचा नियम, कंपन्यांच्या मनमानीवर कायदा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:14 IST

कामाच्या वेळेचे नियमन करण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये दुकाने आणि आस्थापना कायदे देखील लागू करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या विधानावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर आता लार्सन अँन्ड टुब्रो कंपनीचे चेअरमन एस.एन सुब्रमण्यम यांनीही पुढे जात कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० तास काम करायला हवं असं म्हटलं. सुब्रमण्यम यांच्या विधानामुळे कामाचे तास आणि कंपन्यांमधील वर्क कल्चर यावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. भारतात कामाच्या तासाबाबत कायदा काय आहे, ओव्हरटाईम केल्यानंतर कंपनीकडून पैसे न मिळाल्यास कुठे तक्रार करायची, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर काय कारवाई केली जाते हे जाणून घेऊया.

भारतीय कायद्यानुसार, कामाचे तास निर्धारित केलेले आहेत. भारतात कर्मचाऱ्याला एका दिवसाला कमीत कमी ८ ते ९ तास काम करायला लावलं जाऊ शकते. आठवड्याला एकूण कामाचे तास ४८ हून अधिक असू नयेत म्हणजे ६ दिवसाला ४८ तासापेक्षा जास्त काम नको. जर कंपनी कर्मचाऱ्याकडून ओव्हरटाईम करून घेत असेल तर तेदेखील आठवड्याला ६० तासापेक्षा जास्त नकोत. कायद्यानुसार, कामावेळी ५ तासांचे काम केल्यानंतर १ तासाचा ब्रेक देणे गरजेचे आहे. 

कामाच्या वेळेचे नियमन करण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये दुकाने आणि आस्थापना कायदे देखील लागू करण्यात आले आहेत. हा कायदा कार्यालये, दुकाने आणि उत्पादन युनिटमध्ये काम करणाऱ्यांना लागू आहे. याअंतर्गत दररोज नऊ तास काम निश्चित करण्यात आले आहे पण दर आठवड्याला ४८ तासांपेक्षा जास्त काम करता येत नाही. कंपनी कायदा १९४८ च्या कलम ५१ मध्ये कोणत्याही प्रौढ कामगाराला आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोणत्याही कंपनी किंवा फॅक्टरीत काम करण्याची आवश्यकता नाही ना तशी परवानगी देण्यात आली आहे. त्याच कायद्याच्या कलम ५५ मध्ये असं म्हटलंय, कर्मचारी सलग पाच तासांपेक्षा जास्त काम करणार नाहीत. पाच तास काम केल्यानंतर, किमान एक तास विश्रांती आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी कुमार दुबे यांनी सांगितले.

ओव्हरटाइम केल्यास दुप्पट मानधन

दुकाने आणि आस्थापनांनी ओव्हरटाइमसाठी पैसे द्यावेत. जर एखादा कर्मचारी दिवसातून नऊ तासांपेक्षा जास्त किंवा आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करत असेल, तर तो सामान्य वेतनाच्या दुप्पट दराने ओव्हरटाइम मिळण्यास पात्र असेल असं कलम ५९ मध्ये असे म्हटले आहे. त्याच वेळी, दुकाने आणि आस्थापना कायदा आणि कारखाने कायदा दोन्ही आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर लागू आहेत.

दरम्यान, कंपनी कायदा, १९४८ च्या कलम ९२ नुसार, जर कोणताही व्यवस्थापक किंवा मालक या कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करत असेल तर त्याला दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याला १ लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. त्याला एकाच वेळी शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याला जास्त काम करूनही ओव्हरटाइम मिळत नसेल तर तो कामगार न्यायालयात किंवा कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करू शकतो. अशा परिस्थितीत  कंपनीविरुद्ध कारखाने कायदा आणि वेतन कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. एवढेच नाही तर जर कंपनीने वारंवार कायद्याचे उल्लंघन केले तर तिचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो असंही वकील विनित जिंदल यांनी सांगितले आहे.