शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त झाल्यावर येथे मिळतेय नोकरीची संधी, कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 06:20 IST

Indian Army: ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत.

नवी दिल्ली - वर्दी घातलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांवर जगाची नजर असते; पण आता कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर आहे. ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात निवृत्त लष्करी जवानांची भरती करत आहेत.  या योजनेंतर्गत निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे काम करत आहे. त्यांची विविध पदावर नियुक्ती केली जात आहे.

- ॲमेझॉन इंडिया : हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नोकरी- टाटा मोटर्स : समूहाने माजी सैनिकांच्या भरतीसाठी आराखडा तयार केला आहे.- ओएनजीसी : कंपनीच्या मुख्यालयात ८० माजी लष्करी कर्मचारी नियुक्त.- फ्लिपकार्ट : गेल्या वर्षी ५६ माजी लष्करी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. कंपनीत सध्या २०० माजी सैन्य कर्मचारी कार्यरत.- जेपी मॉर्गन चेज : समूहात आर्थिक, संचालन तसेच विविध समूहांत माजी लष्करी कर्मचारी.- विश्व समुद्र समूह : समूहात सध्या अनेक माजी लष्करी कर्मचारी. नवीन कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती सुरू आहे.

काम काय?ॲमेझॉन इंडियाने संरक्षण मंत्रालयासोबत करार केला आहे. ते नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. गेल्या वर्षी ५६ निवृत्त लष्करी कर्मचारीही फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये सामील झाले होते. तर ओएनजीसीचे प्रवक्ते म्हणाले की, कंपनीच्या दिल्लीतील मुख्यालयात ८० लष्करी कर्मचारी जोडले गेले आहेत. हे कर्मचारी सुरक्षा, प्रशासन, तपासणी आणि अतिरिक्त सेवेसाठी काम करत आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरीbusinessव्यवसाय