शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक, 1 पोलीस जखमी, 100 अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:22 IST

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

श्रीनगर - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले असून, यामध्ये 1 पोलीस जखमी झाला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून काही राजकीय नेत्यांसह 100 जणांना अटक करण्यात आली आहे.काश्मीरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. श्रीनगरमध्ये काही दुकाने उघडलेली नजरेस पडत आहेत. तसेच बंदी असतानाही रस्त्यांवर किरकोळ वर्दळ दिसून येत आहे. तणाव असला तरी काश्मीरमधील एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच दहफेकीचे काही किरकोळ प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले. 

  दरम्यान,   जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर मंगळवारी लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर करण्याच्या काही महिने आधीपासून त्या राज्यामध्ये सुरक्षास्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. काश्मीरमध्ये गेल्या दहा दिवसांत निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३५ हजार जवान तैनात करण्यात आले. त्यांना टेहळणी व संपर्कासाठी दोन हजार सॅटेलाईट फोन, ड्रोन व विमाने देण्यात आली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरstone peltingदगडफेकArticle 370कलम 370