शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराला विरोध करणा-या तरुणीला विवस्त्र अवस्थेत चौथ्या मजल्यावरुन फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 13:08 IST

एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात तिला विवस्त्र अवस्थेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात तिला विवस्त्र अवस्थेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या प्रकरणातील मुख्य  आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीच्या रोहिणी भागातील बेगमपूरा येथे 11 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. महिलेची अवस्था गंभीर असून, पोलिसांना अजूनही तिची जबानी नोंदवून घेता आलेली नाही. पीडित महिला दक्षिण दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ आहे. 

रोहिणी भागात एका निर्माणाधीन असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन या तरुणीला खाली फेकण्यात आले. पीडित महिलेच्या मित्रांनी पीसीआरला फोन केल्यानंतर हा दुर्देवी प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी पीडित तरुणी विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळयात पडलेली होती.  पोलिसांनी आम्हाला फोन करुन आमची मुलगी जखमी झाल्याचे कळवले असे पीडित तरुणीच्या वडिलांनी सांगितले. 

माझ्या मुलीची तब्येत चांगली नव्हती तरी, मित्रांनी आग्रह केला म्हणून ती त्यांना भेटायला गेली असे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले. पीडित तरुणी आणि तिचे तीन मित्र फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात. तरुणी तिघांपैकी दोघा तरुणांना ओळखत होती पण आरोपीबरोबर तिची पहिल्यांदाच भेट झाली होती. घटनेच्या दिवशी तिन्ही तरुण पीडित तरुणीच्या घराजवळ गेले व फोन करुन तिला भेटण्यासाठी खाली बोलवले. तरुणी तिथे आल्यानंतर चौघांनी सुभाषनगर येथील मॉलमध्ये जाण्याचा प्लान बनवला. 

चौघेही आरोपीच्या बाईकवर बसून मॉलच्या दिशेने गेले. चौघेही बाईकवर असल्याने पोलिसांनी पंजाबी बाघ भागात त्यांची बाईक अडवली व त्यांना खाली उतरवले. त्यानंतर चौघांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याची गाडी घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन  घरी परतताना अडचण येणार नाही. आरोपीच्या घरी जाण्यासाठी ते ऑटोरिक्षात बसले. 

घरापासून काही अंतरावर त्यांनी रिक्षा थांबवली. आरोपीने दोन मित्रांना गाडी घेऊन येईपर्यंत ऑटोरिक्षात बसण्यास सांगितले. आरोपी पीडित तरुणीला आईशी भेट घडवण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत घेऊन गेला. कोणी सोबत नाहीय हीच संधी साधून त्याने पीडित तरुणीला निर्माणाधीन इमारतीत खेचून नेले. तिथे त्याने तरुणीचे कपडे फाडले व तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. जेव्हा तरुणीने आरडाओरडा सुरु केला. तेव्हा त्याने तरुणीला मारहाण केली व चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिले. 

जमिनीवर पडण्याआधी तरुणीवर लोंबकळणा-या वायर्सवर कोसळली अशी माहिती पोलिसांनी दिली. एका स्थानिकाने या तरुणीला इमारतीवरुन खाली पडताना पाहिले. त्याने आरडाओरडा करुन सर्वांना गोळा केला. पीडित तरुणीचे मित्र जवळच ऑटोरिक्षात बसले होते. त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली आणि पीसीआरला फोन केला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.