शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेस सोशल मीडियावरही झाला सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:09 IST

प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाज माध्यमांवर त्यावर मोहीमच सुरू केली आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाज माध्यमांवर त्यावर मोहीमच सुरू केली आहे. या योजनेवरून भाजपने हल्ला करायच्या आधी काँग्रेसला त्याचा एवढा प्रचार करायचा आहे की भाजपचा हल्ला बोथट व्हावा.राहुल गांधी यांनी स्वत: व्यासपीठावर ती घोषणा केली व लगेचच फेसबुकवर पोस्ट केले की ‘आमचे लक्षावधी बंधू-भगिनी गरीबीशी संघर्ष करीत असेपर्यंत आम्ही नवा भारत घडवू शकत नाही. २०१९ मध्ये आम्ही केंद्रात सत्तेवर आलो तर काँग्रेस किमान उत्पन्न हमी योजना सुरू करण्यास बांधिल आहे. या योजनेमुळे प्रत्येक प्रत्येक गरीबाला मदत मिळेल आणि गरीबी नष्ट करायला मदत मिळेल. हे आमचे आश्वासन आणि दृष्टिकोणही आहे.’ या पोस्टनंतर पी. चिदंबरम यांनी टिष्ट्वटरवर राहुल यांची ही घोषणा ऐतिहासिक असल्याचे सांगून ही योजना गरीबांसाठी गेमचेंजर म्हटले. ते म्हणतात, ‘युबीआयबद्दल गेल्या दोन वर्षांत चर्चा झाली. आता ती स्वीकारण्याची वेळ आली आहे म्हणजे गरीबांसाठी ती राबवता येऊ शकेल. याचा अधिक तपशील काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात देईल.’चिदंबरम यांनी आकडेवारी देऊन लिहिले की, ‘१.४८ लाख लोकांना २००४ ते २०१४ दरम्यान दारिद्र्य रेषेवर आणले गेले. आता गरीबी मूळापासून काढून टाकण्याची वेळ आली आहे. काँग्रेस राहुल गांधी यांचे आश्वासन पूर्ण करील.’ राहुल आणि चिदंबरम यांच्या पोस्ट आणि टिष्ट्वटने हे स्पष्ट केले की, काँग्रेस इंदिरा गांधी यांच्या मार्गांनी प्रवास करण्यास कटिबद्ध आहे. इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाओ’ घोषणा केली होती. आज काँग्रेस पुन्हा तेच आश्वासन सत्यात आणण्यासाठी २०१९ मध्ये विरोधकांशी दोन हात करील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस