शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचा बंगला कोणत्या खासदाराला?; आवराआवरी अन् सरकारचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 08:53 IST

बंगला सोडण्यास सांगणाऱ्या मोदी सरकारकडूनही या बंगल्याचे तातडीने वाटप केले जाईल.

- सुनील चावके नवी दिल्ली : खासदारकी रद्द झाल्यामुळे चर्चेत आलेला ल्युटन्स दिल्लीतील १२, तुघलक लेन बंगला सोडण्यासाठी राहुल गांधी तत्परता दाखवीत असताना हा बंगला रिकामा होताच वेळ न दवडता नव्या व्यक्तीला त्याचे वाटप करण्यासाठी लोकसभेची आवास समितीही तत्पर असल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी १९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले, त्यावेळी त्यांना २००५ साली केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने एसपीजी सुरक्षेच्या नावाखाली कॅबिनेटमंत्र्यांना दिला जातो त्या श्रेणीतील १२, तुघलक लेन बंगला दिला होता. राहुल गांधी यांच्या बंगल्यातील सामानाची बांधाबांध सुरू झाली असून, ते  येत्या काही दिवसांतच बंगला सोडणार असल्याचे समजते. बंगला सोडण्यास सांगणाऱ्या मोदी सरकारकडूनही या बंगल्याचे तातडीने वाटप केले जाईल. खासदार सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती विलंब न लावता राहुल यांचा बंगला कोणत्या खासदाराला देते, याकडे लक्ष लागले आहे. 

या बंगल्यांकडे कानाडोळा का?

दिल्लीत सध्या गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, डॉ. सुब्रमण्यम स्वामी ही मंडळी संसदेच्या सभागृहाचे सदस्य नसताना सरकारी बंगल्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी काहींना अतिरेक्यांकडून धोका असल्याच्या कारणाखाली बंगले देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर राजस्थानचे आमदार असलेले काँग्रेसचे सचिन पायलट यांचाही ल्युटन्समधील बंगला शाबूत आहे. राहुल यांना बंगला सोडण्यासाठी निर्देश देताना या नेत्यांकडे कानाडोळा का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस