शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

PM मोदींनंतर पेट्रोलियमंत्र्यांनीही राज्य सरकारला सुनावलं, सांगितली कर कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 10:55 IST

महाराष्ट्राला केंद्र कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रासारख्या, देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मोदींनंतर, आता  पेट्रोलियमंत्र्यांनीही महाराष्ट्र सरकारला सुनावलं आहे. 

महाराष्ट्राला केंद्र कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी, असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही, आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, अशी माहिती देत मुख्यमंत्र्यांनी मोदींवर पलटवार केला होता. आता, या वादात स्वत: पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी उडी घेतली आहे. 

हरदीप सिंग म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने सन 2018 पासून 79,412 कोटी रुपये कर गोळा केला असून या वर्षी 33 हजार कोटी जम होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे एकूण 1,12,757 कोटी रुपये कराच्या माध्यमातून जमा केले आहेत. मग, पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी करत नाहीत. सर्वसामान्यांन दिलासा का देत नाहीत?, असा सवाल पुरी यांनी उपस्थित केला आहे. मोदींनंतर आता पेट्रोलियमंत्र्यांनीही महाराष्ट्र सरकारला व्हॅट कमी करण्याचे सूचवले आहे. 

फडणवीसांचाही राज्य सरकारवर निशाणा 

''दोषारोपाचा खेळ हा बचाव करण्यासाठी आणि गैरकृत्ये लपवण्यासाठी चांगला आहे. पण, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये भारत सरकारने इंधनाच्या किमतींवरील उत्पादन शुल्क कमी केले, तेव्हा राज्यांना कर कमी करण्याची विनंतीही केली होती. परंतु, महाराष्ट्रासह बिगर-भाजप शासित राज्ये जनतेला त्रास देत केवळ नफा कमाविण्यात व्यस्त आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राने आधीच 3400 कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की, त्यांनी त्वरित कार्यवाही करुन मराठी माणसाला दिलासा द्यावा,'' अशी मागणीही फडणवीस यांनी ट्विटरद्वारे केली आहे.  

टॅग्स :Petrolपेट्रोलministerमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे