शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवार-राऊत भेटीनंतर ममता बॅनर्जींच्या 'त्या' विधानामुळे बेरीज-वजाबाकी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 17:24 IST

2019च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आल्या आहेत.

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आल्या आहेत. दिल्लीत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून, त्या भाजपा आणि काँग्रेसचे नेते सोडल्यास इतर नेत्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.ममता बॅनर्जी यांनी संसदेतील आरजेडीच्या खासदार असलेल्या मीसा भारती यांचीही भेट घेतली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना आणि राजदच्या खासदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर एक राजकीय विधान केलं आहे. 2019ची लोकसभा निवडणूक ही रंगतदार होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, ममता नवी दिल्लीत जनता दल(युनायटेड)चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवालांसह शिवसेना आणि तेलुगू देसमच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेणार नाहीत. परंतु त्या सोनिया गांधींची भेट घेऊ शकतात. ममता या नेत्यांच्या भेटीत तिसरी आघाडीसाठी अस्तित्वात येऊ शकते का, याची चाचपणी करणार आहे. त्यामुळेच 2019ची लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आरजेडीच्या खासदार असलेल्या मीसा भारती यांची भेट घेतल्यानंतर ममता अजून राजकीय खासदारांच्या भेटी घेणार आहेत. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या आग्रहाखातर ममता सोनिया गांधींच्या भेटीला जाणार असल्याचीही चर्चा आहे.ममता 2019च्या निवडणुकीत विरोधकांना एकत्र करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी तिस-या आघाडीसाठी विरोधकांना एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी एक स्पष्ट अजेंडा ठेवूनच दिल्लीत दाखल झाल्या आहेत, असंही तृणमूलच्या एका वरिष्ठ अधिका-यानं सांगितलं आहे. काँग्रेस आघाडीचा यूपीएचा आपण भाग बनणार नसल्याचंही ममतांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसची डाव्यांसोबत आघाडी असल्यानं तृणमूलनं त्यांच्यासोबत जाणं योग्य नसल्याचं त्या नेत्यानं सांगितलं आहे. भाजपाच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी ममतांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचीही भेट घेतली होती. तसेच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनाही समर्थन दिलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी सर्व शक्यता पडताळून पाहणार आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारSanjay Rathodसंजय राठोड