शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

माल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 12:47 IST

बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परागंदा झालेल्यांच्या यादीत नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय माल्यानंतर आता आणखी एका उद्योगपतीचा समावेश झाला आहे.

नवी दिल्ली- बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परागंदा झालेल्यांच्या यादीत नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय माल्यानंतर आता आणखी एका उद्योगपतीचा समावेश झाला आहे. गुजरातमधला व्यावसायिक नितीन संदेसरा हा बँकांमध्ये 5 हजार कोटींचा घोटाळा करून नायजेरियात पळून गेला. स्टर्लिंग बायोटेकचा सर्वेसर्वा नितीन संदेसरा याच्यावर 5 हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो दुबईत असल्याची माहिती मिळाली होती. परंतु तो आता नायजेरियात फरार झाला आहे, अशी माहिती ईडी आणि सीबीआयच्या सूत्रांकडून समोर आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, ईडी आणि सीबीआयच्या सूत्रांना नितीन, त्याचा भाऊ चेतन संदेसरा, वहिणी दीप्ती बेन संदेसरा आणि कुटुंबीयांतील इतर सदस्य नायजेरियात असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु त्याची अजून खातरजमा झालेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी नितीनला दुबईत यूएई पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. कालांतरानं ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं. त्यानंतर नितीन संदेसरा आणि त्याचे कुटुंबीय नाजयेरियात परागंदा झाले. भारताचा नायजेरियाबरोबर कोणताही प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे त्याला नायजेरियातून भारतात परत आणणं अवघड आहे.तपास यंत्रणांनी यूएई प्रशासनाला संदेसराच्या अटकेचा अर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून संदेसरा कुटुंबीयांना रेड कॉर्नर नोटीसही बजावता येईल. नितीन संदेसरा यानं औषधं विकण्यापासून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं ऑइल, रिएल एस्टेटसह अन्य व्यवसाय सुरू केले. संदेसरा याचा व्यवसाय भारताशिवाय नायजेरिया, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, अमेरिका, सेशल्स आणि मॉरिशसपर्यंत पसरला आहे. नायजेरियात त्याच्या तेलाच्या खाणी असल्याचीही चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीनं स्टर्लिंग बायोटेकच्या दिल्ली, मुंबई, बडोदा, अहमदाबाद आणि सूरतसह देशातल्या विविध शहरांमधल्या 50 ठिकाणी छापेमारी केली आहे.