शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा, मुंबईनंतर आता दिल्लीतही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले मजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:49 IST

दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देमुंबईनंतर आज दिल्लीतही हजारोंच्या संख्येने मजुरांनी यमुना नदीच्या काठावर गर्दी केली होतीया मजुरांना फळे देऊन दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहेअशा प्रकारे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडॉऊनमुळे देशाच्या अनेक भागांत लोक जिथल्या तिथेच अडकून पडले होते.  सरकारने जारी केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा 3 मेपर्यंत वाढवला. यामुळे या मजुरांची चिंता आणि भीती वाढली आहे. या काळात हाताला कामही नाही. यामुळे यांच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे. परिणामी हे मजूर आता आपल्या घराकडे जाण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरू लागले आहेत. असाच प्रकार मुंबईतील वांद्रा रेल्वेस्टेशननंतर आज (बुधवारी) दिल्लीतही बघायला मिळाला. येथे हजारोंच्या संख्येने मजुरांनी यमुना नदीच्या काठावर गर्दी केली होती.

मुंबई पाठोपाठ आता दिल्लीतही सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजताना दिसत आहेत. येथेही हजारोंच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले आहेत. येथील यमुना नदीच्या काठावर हे सर्व मजूर एकत्र आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या मजुरांना फळे देऊन दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मजूर आपापल्या राज्यात जाण्यासाठी जमले आहेत, की आणखी काही कारणाने एकत्र आले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, येथे सोशल डिस्टंसिंगचे पार तीन-तेरा वाजताना दिसत आहे. 

दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11933 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 392 वर गेला आहे. तसेच 1344 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतMumbaiमुंबईLabourकामगार