शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:00 IST

15 जूनला चांद्रयान 2 झेपावणार

नवी दिल्ली: चंद्रयान 1 मोहीम यशस्वी झाल्यानंतर चांद्रयान 2 यशस्वी करण्यासाठी इस्रोची यंत्रणा सज्ज झाली आहे. यानंतर इस्रो सूर्य आणि शुक्रच्या दिशेनं उड्डाण करणार आहे. चांद्रयान 2 मोहिमेच्या तयारीची माहिती देताना केंद्र सरकार आणि इस्रोनं आगामी योजनांबद्दल भाष्य केलं. मिशन चांद्रयानसाठी 10000 कोटींचा खर्च येणार आहे.केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आज चांद्रयान 2 सह आगामी काळातील योजनांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून अंतराळ क्षेत्रात भारतानं महत्त्वपूर्ण मोहिमा पूर्ण केल्या असून येत्या काळात सूर्य आणि शुक्र हे इस्रोचं लक्ष्य असेल, असं सिंह यांनी सांगितलं. 'चांद्रयान-2 शनिवारी (15 जून) अवकाशात झेपावेल. या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतातच प्रशिक्षण देण्यात आलं आहे,' अशी माहिती इस्रोच्या प्रमुखांनी दिली.15 जूनला अंतराळात झेपावणारं चंद्रयान-2 म्हणजे चांद्रयान-1 मोहिमेचा पुढचा टप्पा असेल, असं जितेंद्र सिंह म्हणाले. इस्रोचं पुढील लक्ष्य सूर्य असेल. यासाठी मिशन सन राबवण्यात येईल, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध एक उपग्रह पाठवण्याची आमची योजना आहे. अंतराळ क्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेला देश होण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. गगनयान मोहीम 2021 पर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2023 मध्ये शुक्र मोहिमेची योजना आखण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. जागतिक तापमानवाढीच्या समस्येवरदेखील काम सुरू असल्याचं ते म्हणाले.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2