शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येकडील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर अखेर राहुल बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 17:42 IST

ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. काँग्रेस पक्ष त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या जनाधाराचा सन्मान करतो. आम्ही उत्तर-पूर्व राज्यांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. काँग्रेस पक्ष त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या जनाधाराचा सन्मान करतो. आम्ही उत्तर-पूर्व राज्यांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.ईशान्येकडील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला निवडणुकांत यश मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत राहुल गांधींनी कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. 3 मार्च रोजी ईशान्येकडील तीन राज्ये त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालाच्या जवळपास 48 तासांनंतर राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या ट्विटची अनेक जण आतुरतेनं वाट पाहत होते. तसेच ईशान्येकडील नेते काँग्रेसचा झालेल्या पराभवावर टिप्पणी करण्यास धजावत नव्हते. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. तर मेघालयातही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिलं आहे.त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी रविवारी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे राजीनामा सोपविला. विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारीच जाहीर झाले. भाजपाने डाव्या पक्षांची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावत येथे बहुमत मिळविले आहे. तर मेघालयातही ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या भाजपाच्या मित्रपक्षाचे नेते कॉन्राड संगमा यांनी मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची रविवारी भेट घेऊन 34 आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला.या आधी मेघालय विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर, मुकुल संगमा यांनीही राज्यपालांना भेटून सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेसाठी आपल्याला आधी संधी द्यावी, अशी विनंती केली. नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे.  रिओ हे राज्यात 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नागालँडमधील 60 सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला 18, तर सहकारी पक्ष भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी