शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीनंतर मोदी सरकार आता इन्कम टॅक्स कायद्यात बदल करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 11:41 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करुन अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत अमूलाग्र बदल केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने आता 50 वर्ष जुन्या इन्कम टॅक्स कायद्यामध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली आहे.

ठळक मुद्देअन्य देशात जे प्रत्यक्ष कर कायदे आहेत त्याचा अभ्यास करुन आजच्या काळाशी सुसंगत आणि देशाच्या आर्थिक गरजा ध्यानात घेऊन नवीन कायद्याचा मसुदा तयार केला जाईल

नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करुन अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत अमूलाग्र बदल केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने आता 50 वर्ष जुन्या इन्कम टॅक्स कायद्यामध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. नव्या प्रत्यक्ष (डायरेक्ट) कर कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी सात सदस्यीय टास्क फोर्स स्थापन केला. टास्क फोर्स 50 वर्ष जुन्या इन्कम टॅक्स कायद्याचा आढावा घेईल तसेच देशाच्या आर्थिक गरजा ध्यानात घेऊन नवीन कायद्याचा मसुदा तयार करेल. 

अन्य देशात जे प्रत्यक्ष कर कायदे आहेत त्याचा अभ्यास करुन आजच्या काळाशी सुसंगत आणि देशाच्या आर्थिक गरजा ध्यानात घेऊन नवीन कायद्याचा मसुदा तयार केला जाईल. सहा महिन्यात टास्क फोर्स आपला अंतिम अहवाल सरकारकडे सोपवेल. सप्टेंबर महिन्यात कर अधिका-यांच्या कार्यक्रमात  बोलताना मोदींनी इन्कम टॅक्स कायद्याला 50 वर्ष झाली असून आता यात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. 1961 साली देशाचा इन्कम टॅक्स कायदा बनवण्यात आला होता. 

सीबीडीटीचे सदस्य अरबिंद मोदी यांच्याकडे टास्क फोर्सच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम टास्क फोर्सचे कायमस्वरुपी सदस्य असतील. त्याशिवाय चार्टर्ड अकाऊंटट गिरीश आहुजा, चार्टर्ड अकाऊंटट राजीव मेमानी, अहमदाबादचे कर अधिवक्ता मुकेश पटेल, मानसी केडिया आणि निवृत्त भारतीय महसूल सेवेचे अधिकारी जी.सी.श्रीवास्तव या टास्क फोर्सचे सदस्य असतील. 

प्रत्यक्ष कर कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न २००९ मध्येही झाला होता. त्या वेळी पी. चिदंबरम आणि त्यांच्या सहका-यांनी तयार केलेली प्रत्यक्ष करसंहिता (डीटीसी) प्रणव मुखर्जी यांनी जारी केली होती. परंतु, नवीन प्रत्यक्ष कर कायद्यासंबंधीचे विधेयक मांडले गेले नाही.जीएसटीमध्ये व्यग्र असल्याने मोदी सरकारनेही प्राप्तिकर कायदा नव्याने तयार करण्याचा बेत रहित केला होता; परंतु, जीएसटी लागू झाल्याने पंतप्रधान मोदी यांनी ‘राजस्व ज्ञान संगम’ या कर अधिका-यांच्या वार्षिक कार्यक्रमात स्वत:हून कालबाह्य प्रत्यक्ष कराच्या जागी नवे कायदे आणण्याच्या गरजेवर भर दिला होता.

नवीन प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तयार करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यावर सर्व संबंधितांसह जनतेचे अभिप्राय जाणून घेता येतील आणि त्यावर विचार करून आवश्यकतेनुसार बदल करणे सोयीचे होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सGSTजीएसटी