शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election Result 2023 : मतमोजणीत आघाडी मिळताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू, सिद्धारमैय्यांच्या पुत्राने केली अशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 09:47 IST

Karnataka Election Result 2023 Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यादरम्यान, कर्नाटकचे माजी  मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारमैय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धारमैय्या यांनी सूचक विधान केलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यादरम्यान, कर्नाटकचे माजी  मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारमैय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धारमैय्या यांनी सूचक विधान केलं आहे. त्यांनी कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील सिद्धारमैय्या यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं पाहिजे, असं विधान केलं आहे.

मतमोजणीतील सकाळी ९.४५ पर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेस ११२, भाजपा ८६, जेडीएस २३ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, यतिंद्र सिद्धारमैय्या म्हणाले की, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत. राज्याच्या हितासाठी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. कर्नाटकच्या विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झालं होतं. यावेळी प्रचारादरम्यान, सत्ताधारी भाजपा, मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत होती. मात्र आता जनतेने कर्नाटकच्या सत्तेच्या किल्ल्या कुणाच्या हातात सोपवल्या आहेत, हे थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते सिद्धारमैय्या आणि डी.के. शिवकुमार तसेच जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा ३८ वर्षांची परंपरा तोडून सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेसला सत्तांतर घडवून आणण्याबाबत पूर्ण विश्वास आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये दणदणीत विजय मिळाल्यास या विजयाचा पुरेपूर वापर २०२४ च्या लोकसबा निवडणुकीपूर्वी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी करता येईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. मतमोजणीतील सकाळी ९.४५ पर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेस ११२, भाजपा ८६, जेडीएस २३ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत.  

 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेस