शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

IAS Success Story: भारीच! UPSC मध्ये 4 वेळा नापास; नंतर IBमध्ये जॉब करत दिला पेपर अन् बनली IAS ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 19:56 IST

IAS Nupur Goyal Success Story: आयएएस नुपूर गोयल यांची संघर्षमय कहाणी अनेकांसाठी प्रेरणा आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. तर काही उमेदवारांना ती पास करण्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. आयएएस अधिकारी नुपूर गोयल यांचीही अशीच कहाणी आहे. त्या देखील अनेक प्रयत्न करूनही मुलाखतीचे आव्हान पार करू शकल्या नव्हत्या. मात्र, त्यांचे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयामुळे त्यांना शेवटच्या प्रयत्नात 2019 मध्ये अखिल भारतीय रँक 11 मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत झाली.  

दरम्यान, नुपूर गोयल या दिल्लीतील नरेला येथील रहिवासी आहेत. डीएव्ही कॉलेजमधून इंटरमिजिएट पूर्ण केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली. बीटेक केल्यानंतर त्यांनी इग्नूमधून लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली. खरं तर यावेळी त्याच्या काकांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती, पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांच्यापासून प्रेरित होऊन नुपूर यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरूवात केली.

पाचव्या प्रयत्नात बनल्या IAS 2014 मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा पास केली, परंतु मुलाखत पास करण्यात त्यांना अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना प्राथमिक परीक्षाही पास करता आली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्या पुन्हा एकदा मुलाखतीला पोहोचल्या पण यश मिळू शकले नाही. लक्षणीय बाब म्हणजे चौथ्या प्रयत्नात देखील त्यांना अपयश आले. त्यानंतर त्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB) नोकरीला लागल्या. इथेच त्यांनी शेवटच्या प्रयत्नाची तयारी केली आणि 2019 मध्ये AIR 11 मिळवून IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

तरूणाईला दिला मोलाचा सल्लानागरी सेवा परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी शेवटच्या प्रयत्नापर्यंत हार मानू नये, असे नुपूर यांचे ठाम मत आहे. त्यांनी ध्येयाकडे वाटचाल करत राहावे. प्रिलिम्ससाठी मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या असतात, तर मुख्यसाठी उत्तर लिहिण्याचा सराव केला पाहिजे. उमेदवारांनी दररोज वर्तमानपत्र वाचावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :delhiदिल्लीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी