शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निकालांपूर्वीच कर्नाटक काँग्रेसमध्ये 'कल्ला'; नेत्यांमध्ये जुंपली, आरोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:51 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे.

बंगळुरू  - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेते रोशन बेग यांनी  पक्षातील सहकारी नेते सिद्धारामय्या, के. सी. वेणुगोपाल आणि दिनेश गुंडू राव यांच्यावर गंभीर टीका केली आहे. कर्नाटकमध्ये भाजपाला 18 हून अधिक जागा मिळतील आणि याला सिद्धारामय्या कारणीभूत असतील, असा आरोप बेग यांनी केला आहे. तसेच पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांची जोकर अशी संभावना त्यांनी केली आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन आघाडी सरकार स्थापन केले होते. मात्र स्थापनेपासूनच हे सरकार अस्थिर आहे. आता एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये असंतोष आणि बंडखोरी उफाळून आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनी आपल्या पक्षसहकाऱ्यांवर गंबीर आरोप केले आहे. '' कर्नाटकमध्ये भाजपाला 18 हून अधिक जागा मिळतील आणि याला सिद्धारामय्या कारणीभूत असतील, सिद्धारामय्या यांनी लिंगायत समाजाला पक्षापासून तोडले. आता आपले नाक कापून घेण्याशिवाय कुठलेही काम उरलेले नाही. सिद्धारामय्या यांनीच कर्नाटक सरकारला संकटात टाकले आहे. सरकार चालावे आणि कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदी राहावेत, अशी सिद्धारामय्या यांची इच्चा नाही,''असा आरोप रोशन बेग यांनी केला.

कर्नाटकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपावरही रोशन बेग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जागावापात ख्रिश्चन समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. तसेच मुस्लिम उमेदवाराला केवळ एकच जागा देण्यात आली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले,''असा आरोपही बेग यांनी केला. 

दरम्यान, रोशन बेग यांनी केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे, पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे   कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी स्पष्ट केले आहे. 

 तसेच कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेआहेत. रोशन बेग यांनी केलेले आरोप अयोग्य आणि राजकीय संधीसाधूपणाचे आहेत, असे म्हटले आहे.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९