शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आपच्या अपात्र आमदारांना निवडणूक आयोगानंतर कोर्टानेही फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 21:54 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी लाभाचे पद बाळगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे. यानंतर या आमदारांनी याविरोधात कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांच्या आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी लाभाचे पद बाळगल्या प्रकरणी आपच्या  20 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे. यानंतर या आमदारांनी याविरोधात कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र कोर्टाकडून या आमदारांना कोणताही दिलासा मिळाला नाही. कोर्टाने याप्रकरणी कोणताही अंतरिम आदेश न देता याचिका करणाऱ्या आमदारांनाच फटकारले आहे.तुम्ही निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिशीला का उत्तर दिले नाही? असा सवाल याचिका दाखल केलेल्या आपच्या लाभार्थी आमदारांना यावेळी कोर्टाने केला. याचबरोबर, निवडणूक आयोगापुढे उभे राहून तुम्ही तुमची बाजू का मांडली नाही? अशीही विचारणा कोर्टाकडून करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाला जे योग्य वाटते आहे. तशी कारवाई करण्यास आता निवडणूक आयोग स्वतंत्र आहे, असे कोर्टाने सांगितले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयांमुळे दिल्लीमध्ये 20 जागांवर पोटनिवडणूक होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाल्यापासून आप आमदारांच्या लाभाच्या पदाच्या मुद्यावरुन वाद सुरु झाला होता. दिल्लीतील वकिल प्रशांत पटेल यांनी या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सर्व आमदारांनी त्यांच्यावर लाभाच्या पदावरुन झालेले आरोप रद्द करावेत यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. पण जून 2017 मध्ये निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.या आमदारांना संसदीय सचिव बनवल्याच्या मुद्यावरुन ही कारवाई करण्यात आली. आपण कुठलीही सुविधा घेत नसल्याचे या आमदारांचे म्हणणे होते. दिल्ली उच्च न्यायालयानेही आपच्या त्या 21 आमदारांना संसदीय सचिव बनवण्याचा दिल्ली सरकारचा आदेश रद्दबातल ठरवला होता. केंद्रानेही या निर्णयाला विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांचा संसदीय सचिव वगळता अन्य संसदीय सचिव पदांना संविधानात कुठेही स्थान नाही असे केंद्राने न्यायालयात सांगितले होते. अरविंद केजरीवालांच्या या निर्णयाविरोधात काही स्वयंसेवी संस्थांनी कोर्टात याचिका केली होती. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीCourtन्यायालय