शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:15 IST

नवीन सर्कल दर सोमवारपासून (९ जूनपासून) लागू करण्यात आले आहेत. रामजन्मभूमी मंदिराच्या दहा किलोमीटर परिसरात जमिनीच्या किमतीत विशेषतः मोठी वाढ झाली असून, काही भागांमध्ये दर १५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

अयोध्या (उत्तर प्रदेश) : राममंदिराभोवती धार्मिक पर्यटन आणि जमिनीचे व्यवहार वाढल्याने अयोध्येत आठ वर्षांनंतर सर्कल रेट (म्हणजेच नोंदणीसाठी ठरवलेली किमान जमीन किंमत) मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. ही वाढ ३० टक्क्यांपासून २०० टक्क्यांपर्यंत झाली आहे. नवीन सर्कल दर सोमवारपासून (९ जूनपासून) लागू करण्यात आले आहेत. रामजन्मभूमी मंदिराच्या दहा किलोमीटर परिसरात जमिनीच्या किमतीत विशेषतः मोठी वाढ झाली असून, काही भागांमध्ये दर १५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था

सर्वाधिक महागडे परिसर?

ज्या भागांमध्ये जमीन व्यवहार सर्वाधिक होत आहेत तिथे दर सर्वाधिक वाढविले गेले. रकाबगंज, देवकली आणि अवध विहार निवासी योजना हे सध्या जिल्ह्यातील सर्वांत महागडे भाग ठरले आहेत. मंदिर परिसरातील दर आता प्रति चौ.मीटर २६,६०० ते २७,९०० रुपये इतके झाले आहेत. हे दर पूर्वी ६,६५० ते ६,९७५ रुपये होते.

वेगवेगळी दरवाढ

नवीन दरवाढ निवासी, व्यापारी आणि शेतीसाठी असलेल्या जमिनींसाठी वेगवेगळ्या प्रकारे केली गेली आहे. त्या भागातील मागणी आणि वापराच्या आधारावर हे दर निश्चित केले गेले.

बिल्डर म्हणतात...

अयोध्येतील एका बिल्डर कंपनीचे संचालक सौरभ विक्रम सिंह म्हणाले, “सर्कल रेट वाढल्यामुळे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) देखील वाढते.

मात्र याचा फायदा जमीनधारकांना होतो, कारण त्यांच्या जमिनीचे मूल्य वाढते. त्यामुळे कर्जासाठी मूल्यमापन करणे सोपे जाते. सर्कल रेट वाढवल्याने पांढरा आणि काळा पैसा यामधील फरक कमी होईल. त्यामुळे पारदर्शकता वाढेल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर